Alert For HDFC Bank Customers: एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या महिन्यात बँकेची यूपीआय सेवा तीन तास बंद राहणार आहे. काही आवश्यक सिस्टम देखभालीमुळे येत्या ८ फेब्रुवारी मध्यरात्रीपासून पहाटे ३.०० वाजेपर्यंत ग्राहक यूपीआय सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत, अशी माहिती एचडीएफसी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
एचडीएफसी बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेची यूपीआय सेवा येत्या ८ फेब्रुवारी मध्यरात्री १२.०० वाजता बंद होईल. त्यानंतर तीन तासांनी म्हणजेच पहाटे ३.०० वाजता यूपीआय सेवा सुरळीत होईल, असे स्पष्ट करण्यात आले. या कालावधीत ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन किंवा कार्ड पेमेंट करता येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
ग्राहकांना फाइनेंशियल आणि नॉन-फाइनेंशियल यूपीआय व्यवहार करू शकणार नाहीत. हा व्यवहार चालू खाते, बचत खाते आणि रुपे क्रेडिट कार्डवर उपलब्ध राहणार नाही. याशिवाय, एचडीएफसीचे यूपीआय व्यवहार मोबाईल बँकिंग अॅप, गुगल पे, व्हॉट्सअॅप पे, पेटीएम, श्रीराम फायनान्स, मोबिक्विक आणि क्रेडिट पे करणे शक्य होणार नाही, असे सांगण्यात येत आहे. या कालावधीत ग्राहकांची होणाऱ्या गैरसोयीबद्दल बँकेने दिलगिरी व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या