मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

May 19, 2024 08:22 PM IST

Lok Sabha Election : अखिलेश यादव यांनी रविवारी सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ टाकला त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निष्पक्षतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आठवेळा मतदान करताना तरुण
आठवेळा मतदान करताना तरुण

EVM Viral Video : एकाच वोटरने भाजपला ८ वेळा मतदान दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला घेरले आहे. सपा सुप्रीमो अखिलेश यादव यांनी X वर पोस्ट करत लिहिले आहे की, जर निवडणूक आयोगाला वाटत असेल की, हे चुकीचे आहे तर काही कारवाई जरूर करा. भाजपची बूथ कमेटी, लूट कमेटी आहे. व्हायरल व्हिडिओवर काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिले की, निवडणूक आयोगजी,पाहत आहात ना, एक मुलगा ८-८ वेळा मतदान करत आहे.आता तर जागे व्हा. दरम्यान काँग्रेसच्या पोस्टवर एका युजरने लिहिले की, EVMचा बहाना सुरू? हे कुठले ठिकाण आहे? तुमचा पोलिंग एजेंट तेथे नाही का? तुम्ही (काँग्रेस) निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की केवळ सोशल मीडियावर EVM वर रडगाणे सुरू?

ट्रेंडिंग न्यूज

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ टाकला त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निष्पक्षतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण बारी बारीने वेगवेगळ्या नावांनी बूथवर जातो आणि मतदान करतो. तो मतदान करण्याचा व्हिडिओही बनवत आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की, तो भाजपाला मतदान करत आहे. अखिलेश यांनी व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, जर निवडणूक आयोगाला वाटत असेल की, काहीतरी चुकीचे होतेय तर काही कारवाई जरूर करा. नाही तर....(डॉट डॉट डॉट). भाजपावर निशाणा साधताना अखिलेश यांनी लिहिले की, भाजपाची बूथ कमिटी लूट कमिटी आहे. दरम्यान त्यांनी हा व्हिडिओ कुठला आहे, याचे स्थान सांगितले नाही.

अखिलेश यांनी भलेही १७ सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मात्र सोशल मीडियावर याचा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संपूर्ण व्हिडिओ २ मिनिटे १९ सेकंदाचा आहे. या व्हिडिओत दिसते की, एक मुलगा नंबरा-नंबराने वेगवेगळ्या बुथवर जाऊन मतदान करत आहे. मतदान केल्यानंतर तो आपल्या मतदान केल्याची संख्याही सांगतो. केवळ बूथच्या आतमध्ये मतदान केल्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवतो तर आतमध्ये कोणाच्या नावावर मतदान करायला जात आहे, तेही सांगतो.

टी-२० वर्ल्डकप २०२४