२०० वर्षे दुर्लक्षित राहिला अजमेर शरीफ दर्गा; आता पंतप्रधान मोदी आणि ओबामासारखे नेते पाठवतात चादर, काय आहे इतिहास?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  २०० वर्षे दुर्लक्षित राहिला अजमेर शरीफ दर्गा; आता पंतप्रधान मोदी आणि ओबामासारखे नेते पाठवतात चादर, काय आहे इतिहास?

२०० वर्षे दुर्लक्षित राहिला अजमेर शरीफ दर्गा; आता पंतप्रधान मोदी आणि ओबामासारखे नेते पाठवतात चादर, काय आहे इतिहास?

Jan 14, 2025 04:08 PM IST

Ajmer Sharif Dargah : ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अशा वेळी भारतात आले जेव्हा शहाबुद्दीन गोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात ताराईचे युद्ध सुरू संपले होते व मुस्लिम सत्तेचा उदय होत होता.

अजमेर शरीफ दर्गा इतिहास
अजमेर शरीफ दर्गा इतिहास

History of Ajmer Dargah: अजमेर शरीफ दर्ग्याचा ८३२ वा ऊरुस नुकताच पार पडला. यामुळे अजमेर दर्गा चर्चेत होता. नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान बनले आहेत, तेव्हापासून प्रत्येक वर्षी ते अजमेर दर्ग्याला चादर पाठवतात. दरवर्षी मुख्तार अब्बास नकवी त्यांनी पाठवलेली चादर दर्ग्यावर चढवून येत असत, मात्र यावेळी ही परंपरा तुटली व केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी  अजमेरला जाऊन चादर चढवली. राजस्थानमधील अजमेर दर्गा देश-विदेशात प्रसिद्ध आहे, मात्र तुम्हाला या दर्ग्याचा इतिहास माहिती आहे का? येथे पाकिस्तान, बांग्लादेश, अमेरिका फ्रान्स आणि जर्मनी सारख्या देशातील राजकीय व धार्मिक नेते वेगवेगळ्य वेळी येथे भेटी देत असतात.

कोण होते ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती?

मोइनुद्दीन चिश्ती यांचा जन्म इराणमधील संजर (सिस्तान) येथे झाला होता. ख्वाजा आपल्या काळातील प्रसिद्ध सुफी संत ख्वाजा उस्मान हारूनी यांचे शिष्य होते आणि ११९२ मध्ये आधी लाहोर, त्यानंतर  दिल्ली व तेथून अजमेरला पोहोचले. त्याआधी त्यांना बगदाद आणि हेरातसह अनेक शहरांत सुफी संतांकडून आशीर्वाद मिळाला होते. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अशा वेळी भारतात आले जेव्हा शहाबुद्दीन गोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात तारायणचे युद्ध सुरू संपले होते व मुस्लिम सत्तेचा उदय होत होता. हा कुतुबुद्दीन ऐबक, अल-तमीश, आराम शाह, रुकनुद्दीन फिरोज आणि रजिया सुल्तान यांचा काळ होता. 

एक भाकरी अनेक दिवस खात होते ख्वाजा मोइनुद्दीन -

म्हटले जाते की, ख्वाजाचा महिमा ऐकून अल-तमीश त्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्याचबरोबर रजिया सुल्तान यांनीही त्यांच्या दरबारात हजेरी लावली. ख्वाजा मोइनुद्दीन यांचे अनेक आश्चर्यकारक किस्से आहेत. एका ठिकाणी दावा केला आहे की, ख्वाजा खूप भुकेले असायचे व एक भाकरी (रोटी) अनेक दिवस चालवत असत. तर त्यांच्याजवळ गरजवंत व भुकेल्या लोकांसाठी कायम लंगर तयार असायचा, मात्र ते स्वत: खूप कमी खात असत. १२३६ मध्ये ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तींनी या जगाचा निरोप घेतला. 

दर्ग्याकडे २०० वर्षे दुर्लक्ष -

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समाधीस्थळी लोक लगेच जात नव्हते. त्यांची एक छोटी दर्गा बनवली गेली. मात्र २०० वर्षापर्यंत त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. सुल्तान मोहम्मद खिलजी आणि त्यानंतर गयासुद्दीन यांन येथे कायम स्वरुपी मकबरा बनवला आणि एक सुंदर घुमट बनवले. १३२५ मध्ये पहिल्यांदा या दर्गावर जाणारा सुलतान मोहम्मद बिल तुघलक होता. त्यानंतर खिलजीने  १४५५ मध्ये अजमेरवर कब्जा केल्यानंतर या दर्ग्याल एक ऊंच दरवाजा तसेच मशिदही बनवला. 

सुरुवातील लाकडापासून बनवली अजमेर दर्गा -

इतिहासकारांच्या मते पहिल्यांदा दर्गा लाकडापासून बनवली होती. त्यानंतर ही पक्की केली गेली. दर्ग्यातील एका भिंतीवर असलेल्या शिलालेखानुसार १५३२ मध्ये दर्ग्यावर घुमट बनवले गेले होते, जे अजूनही चांगल्या स्थितीत आहे. याच्या टोकावर रामपूरचे नवाब हैदर अली खान यांनी अर्पण केलेला सोनेरी मुकूटही आहे. 

अकबरच्या शासन काळात जीर्णोद्धार -

तसे पाहिले तर ही दर्गा अनेकांसाठी पवित्र राहिली आहे, मात्र मुगलांनी यावर खूप खर्च केला आहे. एका पुस्तकानुसार जेव्हा अकबर शिकारीला जात होते तेव्हा ते ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या कौतुकाचे गीत लोकांकडून गाताना ऐकले होते. त्यानंतर त्यांची दर्ग्याला जाण्याची इच्छा जाली. अकबर दरवेळी पायी दर्ग्याला जात असे. अकबरानेच या दर्ग्यात मशिदीचे बांधकाम केले. ज्याला अकबरी मशिद नावाने ओळखले जाते. 

अकबरने मोठमोठी पितळीची भांडीही दर्ग्याला भेट दिली होती, जेणेकरून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांसाठी लंगर केला जाऊ शकेल. इतिहासकारांनी म्हटले आहे की, दर्ग्याचे महत्व केवळ अकबरच्या आध्यात्मिक फायद्यासाठी नसून यामुळे भारतात मुगल शासनाला लोकप्रियता मिळवण्यातही मदत झाली.

अकबरनंतर शाहजहां आणि अन्य मुघल सम्राटांनी दर्ग्याच्या निर्माण कार्यात योगदान दिले. शाहजहां यांनी येथे संगमरमरची मशिद बनवली, ज्याला शाहजहां मशिद संबोधले जाते. 

ब्रिटिश सत्तेच्या काळातही दर्गा आध्यात्मिक केंद्र बनले होते. दर्गा सर्व धर्मियांच्या श्रद्धेचे केंद्र बनले होते. येथे दरवर्षी आयोजित होणाऱ्या ऊरुस व अन्य कार्यक्रमासाठी लाखो लोक जमा होतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर