भारतीय हवाई दलाची कमान एअर मार्शल अमरप्रीत यांच्या हाती; तब्बल ५ हजार तास उड्डाणाचा अनुभव-air marshal ap singh named next indian air force chief ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतीय हवाई दलाची कमान एअर मार्शल अमरप्रीत यांच्या हाती; तब्बल ५ हजार तास उड्डाणाचा अनुभव

भारतीय हवाई दलाची कमान एअर मार्शल अमरप्रीत यांच्या हाती; तब्बल ५ हजार तास उड्डाणाचा अनुभव

Sep 21, 2024 04:24 PM IST

Air Marshal Amar Preet Singh : एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची देशाच्या हवाई दल प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. सध्याचे हवाईदल प्रमुख व्हीआर चौधरी हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर अमर प्रीत सिंग हे पदभार घेतील.

भारतीय वायू दलाची कमान एअर मार्शल अमर प्रीत यांच्या हाती; तब्बल पाच हजार तास उड्डाणाचा अनुभव
भारतीय वायू दलाची कमान एअर मार्शल अमर प्रीत यांच्या हाती; तब्बल पाच हजार तास उड्डाणाचा अनुभव

Air Marshal Amar Preet Singh : एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार सांभाळत आहेत. ३० सप्टेंबर रोजी ते हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. विद्यमान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. यानंतर सिंग हे पदभार स्वीकारतील. 

एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय हवाई दलाचे ४७ वे उपप्रमुख म्हणून पदभार हाती घेतला आहे. दरम्यान, हवाई दल प्रमुखपदी अमर प्रीत सिंह याचे नाव चर्चेत होते. अखेर या पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. एअर मार्शल सिंग यांनी डिसेंबर १९८४ मध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलट स्ट्रीममध्ये नियुक्त करण्यात आले. सुमारे ४० वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेदरम्यान, त्यांनी विविध कमांड, कर्मचारी, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्तींमध्ये काम केले आहे. एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांनी त्यांच्या हवाई दलाच्या कारकिर्दीत अनेक मोठे पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी त्यांच्या सेवेत अनेक मोठे यश संपादन केले आहे. २१ डिसेंबर १९८४ रोजी डुंडीगल येथील वायुसेना अकादमीमधून त्यांनी भारतीय हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये रुजू झाले. एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांनी नॅशनल डिफेन्स अकादमी खडकवासला आणि एअर फोर्स अकादमी डुंडीगल येथून प्रशिक्षण घेतलं आहे. या सोबतच त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथून देखील शिक्षण घेतलं आहे. या सोबतच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातून देखील त्यांनी त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. अमर प्रीत सिंह यांनी सेंट्रल एअर कमांडचे ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे.

पाच हजार तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव

एअर मार्शल सिंग हे फायटर पायलट असून त्यांना तब्बल पाच हजार तासांपेक्षा अधिक विमान उड्डाणाचा अनुभव आहे. ते फ्लाइंग इंस्ट्रक्टर व एक प्रायोगिक चाचणी पायलट देखील आहेत. त्यांनी विविध प्रकारच्या स्थिर व रोटरी-विंग विमानांवर पाच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव घेतला आहे. या सोबतच त्यांनी ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि फ्रंटलाइन एअर बेसचं देखील नेतृत्व केलं आहे.

चाचणी पायलट म्हणून सांभाळली मोठी जबाबदारी

एयर मार्शल अमर प्रीत सिंग यांनी चाचणी पायलट म्हणून त्यांनी मॉस्कोमध्ये मिग-२९ अपग्रेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे नेतृत्व केलं केलं आहे. या सोबतच त्यांनी राष्ट्रीय उड्डाण चाचणी केंद्रात प्रकल्प संचालक (उड्डाण चाचणी) म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या उड्डाण चाचणीची देखील जबाबदारी सांभाळली आहे. सध्या भारत आणि चीनमध्ये अरुणाचल ते लडाखपर्यंत तणावाचे वातावरण आहे. अरुणाचलजवळ भारतीय लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. सिंग अशा वेळी प्रमुख पदाची दुरा सांभाळत आहे, जेव्हा भारतीय हवाई दल वेगाने आधुनिकीकरण करत आहे. एअर मार्शल सिंग यांना त्यांच्या असामान्य कार्यासाठी 'अति विशिष्ट सेवा पदक' प्रदान करण्यात आलं आहे. २०१९ मध्ये प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींनी त्यांचा गौरव केला आहे.

भारतीय हवाई दलाच्या एलसीए एमके-१ए (एमके-१ विमानाचा प्रगत प्रकार) कार्यक्रमाला उशीर होत असताना व यामुळे हवाली दलाच्या लढाऊ क्षमतेवर परिमाण होत असतांना यातून सिंग हे कशा पद्धतीने मार्ग काढतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड (एचएएल) या कंपनीने २०२८-२८ पर्यंत ८३ लढाऊ विमानांचे ४८००० कोटी रुपयांचे कंत्राट वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संरक्षण मंत्रालय एचएएलला ६७,००० कोटी रुपयांच्या आणखी ९७ एलसीए एमके-१ए विमानांचे कंत्राट वर्षाच्या अखेरपर्यंत देण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत एलसीए एमके-१ए ची कामे दिलेल्या डेडलाइन पूर्ण होण्याबाबत हवाई दलातील अनेकांना आशंका आहे. कारण अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेसने एचएएलला एफ ४०४ इंजिनपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात विलंब केला आहे.

जीई एअरोस्पेसने एचएएलला कळवले आहे की एलसीए एमके -२ ए कार्यक्रमासाठी ते नोव्हेंबर २०२४ पासून दरमहा दोन इंजिन वितरित करण्यास सुरवात करतील. आयएएफच्या मिकोयान-गुरेविच मिग-२१ लढाऊ विमानाची जागा एमके-१ए घेणार आहे.

एचएएलकडून सुमारे ६५,००० कोटी रुपये खर्चून सुखोई-३० अपग्रेड करणे आणि आणखी प्रचंद हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर्सचा समावेश करणे या आधुनिकीकरणाच्या इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. सुखोई-३० अपग्रेडमध्ये लढाऊ विमानांना स्वदेशी उत्तम अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन अॅरे (एईएसए) रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, वेपन कंट्रोल सिस्टीम, एव्हिओनिक्स आणि नवीन शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले जाणार आहे.

Whats_app_banner
विभाग