सौदी अरेबियाहून दिल्लीला विमानाने येणाऱ्या एका प्रवाशाला दिल्ली विमानतळावर उतरताच पोलिसांनी अटक केली आहे. या प्रवाशाच्या अटकेमागचं कारण मात्र थोडं वेगळं आहे. सौदी अरेबियाची राजधानी जेद्दाह येथे हा विमानप्रवासी विमानात बसला. जेद्दाह ते नवी दिल्ली या साडे पाच तासांच्या विमानप्रवासादरम्यान या प्रवाशाला एअर होस्टेलकडून विविध सेवा ऑफर करण्यात आल्या. परंतु संपूर्ण साडेपाच तासांच्या विमान प्रवासात या प्रवाशाने काही खाल्ले किंवा प्यायले नाही. विमान प्रवासात हा प्रवासी सतत खाण्या-पिण्याचे पदार्थ नाकारत होता. विमान उड्डाण होताच एअर होस्टेसने सर्वप्रथम या प्रवाशाला पिण्याचे पाणी देऊ केले, जे त्याने नाकारले. त्यानंतर तिने विविध अल्पोपहाराचे पदार्थ ऑफर केले. परंतु प्रवाशाकडून एअर होस्टेलसची प्रत्येक ऑफर नाकारण्यात आली. विमानात इतर प्रवाशी एअर होस्टेस ऑफर करत असलेले पदार्थ मटामटा खात असताना हा एकमेव प्रवासी काहीही न खाता-पिता बसून असल्याने एअर होस्टेसला प्रवाशावर थोडा संशय आला. तिने ही बाब आपल्या इतर सहकाऱ्यांना सांगितली. आणि पुढे जो प्रसंग घडला त्याने तो प्रवाशीसुद्धा चक्रावला.
हे वाचाः प्रवाशांसाठी महत्वाची बातमी!
विमानात वारंवार विनंती करूनही एक प्रवासी प्रवासादरम्यान काहीही खात, पित नसल्याचा संशय आल्यानंतर एअर होस्टेसने ही बाब विमानाच्या फ्लाइट कॅप्टनच्या नजरेतस आणून दिली. नवी दिल्ली जवळ येताच विमानातील फ्लाइट कॅप्टनने एअर ट्रॅफिक कंट्रोलला संपर्क साधून ही माहिती दिली. एअर ट्रॅफिकने विमानतळावर असलेल्या सुरक्षा एजन्सींना ही माहिती दिली. विमान दिल्लीत उतरल्यानंतर संशय असलेल्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवून थांबवण्यात येते. हा प्रवासी तपासणीसाठी आला असता त्याने ग्रीन कस्टम क्लिअरन्स चॅनल ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्याची सखोल चौकशी करण्यात आली असता या प्रवाशाने गुदाशयात सोन्याची पेस्ट लपवून तस्करी केल्याचे आढळून आले. त्याने गुदाशयातून सोन्याची पेस्ट असलेली, अंड्याच्या आकाराची चार कॅप्सूल काढून सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवली. या कॅप्सूलमध्ये असलेले अंदाजे १०९६.७६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत सुमारे ६९, १६१६९ रुपये एवढी होती. सीमाशुल्क कायद्याच्या कलमांखाली या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.