Air India: एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाला दिलेल्या जेवणात सापडले मेटल ब्लेड
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air India: एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाला दिलेल्या जेवणात सापडले मेटल ब्लेड

Air India: एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाला दिलेल्या जेवणात सापडले मेटल ब्लेड

Published Jun 17, 2024 05:19 PM IST

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाला दिलेल्या जेवणात मेटल ब्लेड सापडल्याने प्रवाशांमध्ये खळबळ माजली. याप्रकरणी एअर इंडिया स्पष्टीकरण दिले आहे.

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाला दिलेल्या जेवणात मेटल ब्लेड सापडले,
एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाला दिलेल्या जेवणात मेटल ब्लेड सापडले,

Blade in Air India Passengers Meal: एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाला देण्यात आलेल्या जेवणात मेटल ब्लेड सापडले, एअर इंडियाचे चीफ कस्टमर एक्सपीरियंस ऑफिसर राजेश डोगरा यांनी सांगितले की, ही वस्तू कॅटरिंग पार्टनरने वापरलेल्या भाजीपाला प्रोसेसिंग मशीनमधील आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून कंपनीने आपल्या केटरिंग पार्टनरला भाजीपाला तपासणी, प्रक्रिया आणि कापणीची तपासणी करण्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यास सांगितले आहे.

आमच्या एका विमानातील पाहुण्याच्या जेवणात परदेशी वस्तू सापडल्याची माहिती एअर इंडियाने दिली. तपासणीत असे समजले की, आमच्या केटरिंग पार्टनरच्या सुविधेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाजीपाला कापणाऱ्या मशीनमधील असल्याचे निष्पन्न झाले. आम्ही आमच्या केटरिंग पार्टनर याबाबत माहिती दिली, जेणेकरून कोणतीही पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना मजबूत केल्या जातील. विशेषत: कोणतीही कडक भाजी कापल्यानंतर प्रोसेसरची वारंवार तपासणी करणे महत्त्वाचे आहे, असेही डोगरा म्हणाले.

आठवडाभरापूर्वी मॅथुरेस पॉल या प्रवाशाने एक्सवर तक्रार केली होती की, तो एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना त्याच्या जेवणात ब्लेड सापडला. या ब्लेडमुळे नुकसान होण्यापासून तो थोडक्यात बचावला. मात्र, माझ्या ऐवजी लहान मुलगा असता तर कदाचित मोठी समस्या उद्भवली असते.

प्रवाशाने सांगितले की, त्याच्या जेवणात ब्लेडचा तुकडा होता. मात्र, त्याने घास खाल्ल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, जेवणात काही तरी आहे. त्याने त्याने घास तोंडातून बाहेर काढल्यानंतर त्यात ब्लेड दिसला. सुदैवाने त्याला कोणतीही जीवितहानी झाली नाही. अर्थात दोष एअर इंडियाच्या केटरिंग सेवेचा आहे. एखाद्या मुलाला देण्यात येणाऱ्या जेवणात असे काही आढळल्यास…? असे पॉलने एक्सवर लिहिले आहे. पहिल्या फोटोत मी थुंकलेला धातूचा तुकडा आणि दुसऱ्या फोटोत माझ्यासाठी एअर इंडियाने दिलेले जेवण आहे, असेही पॉल म्हणाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर