Air India: एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मोठा निष्काळजीपणा; शाकाहारी प्रवाशाला दिलं मांसाहारी जेवण-air india flight served non veg food to vegetarian passenger ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air India: एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मोठा निष्काळजीपणा; शाकाहारी प्रवाशाला दिलं मांसाहारी जेवण

Air India: एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मोठा निष्काळजीपणा; शाकाहारी प्रवाशाला दिलं मांसाहारी जेवण

Jan 12, 2024 09:20 AM IST

Air India Flight News: एअर इंडियाच्या प्लाइटमधून प्रवास करताना एका महिलेला शाकाऐवजी मांसाहार देण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

Air India
Air India

Air India Latest News: कोझिकोडे मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील एका महिलेला शाकाहारीऐवजी मांसाहार जेवण दिले गेले. याबाबत संबंधित महिलेने सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. वीरा जैन नावाच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून मांसाहारी जेवण्याचे फोटो, पीएनआर क्रमांक आणि फ्लाइटची माहिती देण्यात आली आहे.

इंन्स्टाग्राम पोस्टमध्ये अशी माहिती देण्यात आली की, "एअर इंडियातून प्रवास करताना फ्लाइट क्रमांक एआय ५८२ मध्ये मला चिकनसोबत शाकाहारी जेवण देण्यात आले. मी कोझिकोडे विमानतळावरून फ्लाइटमध्ये चढलो. फ्लाइट संध्या ६.४० ला उड्डाण करणार होती. परंतु, प्लाइट संध्याकाळी ०७. ४० म्हणजेच एक तास उशीराने विमानतळावरून निघाले." पुढे असे सांगण्यात आले आहे की, “मला शाकाहारी जेवणाऐवजी मांसाहार दिल्याची माहिती केबिन सुपरवायझर यांना कळवली, त्यांनी माझी माफी मागितली. माझ्या व्यतिरिक्त अनेकांनी अशा तक्रारी केल्या. याबाबत क्रूला कलवल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही.”

वीराने पुढे लिहिले की, "आधी जेवण देण्यास उशीर, नंतर शाकाहारी जेवणाऐवजी मांसाहार. हे अत्यंत निराशाजनक आहे आणि माझ्या भावना दुखावल्या आहेत. मी एअर इंडियाला विनंती करते की, त्यांच्या खानपान सेवांवर कठोर कारवाई करावी." मी सर्वांना सांगू इच्छिते की, कृपया तुम्ही फ्लाइटमध्ये काय खात आहात? ते पुन्हा एकदा तपासा. शाकाहारीऐवजी मांसाहार मिळाल्याने माझा एअरलाइन्सच्या सर्व खाद्यपदार्थांवरून विश्वास उडाला आहे.”

वीरा जैनच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ माजली. या पोस्टवर अनेकांच्या संतापजन प्रतिक्रिया येत आहेत. तर, काहीजणांनी एअर इंडियाच्या अन्न व्यवस्थापन पद्धतींबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच एअरलाइनच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याशिवाय, काहीजणांनी त्यांच्यासोबतही असा प्रकार घडल्याचा अनुभव शेअर केला आहे.

Whats_app_banner
विभाग