एअर इंडियाच्या विमानाची हायड्रॉलिक यंत्रणा आकाशातच झाली बंद, प्रवाशांचा जीव टांगणीला, सुरक्षित लँडिंग
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एअर इंडियाच्या विमानाची हायड्रॉलिक यंत्रणा आकाशातच झाली बंद, प्रवाशांचा जीव टांगणीला, सुरक्षित लँडिंग

एअर इंडियाच्या विमानाची हायड्रॉलिक यंत्रणा आकाशातच झाली बंद, प्रवाशांचा जीव टांगणीला, सुरक्षित लँडिंग

Updated Oct 11, 2024 10:12 PM IST

Air India Plane issue: एअर इंडियाच्या विमानाची हायड्रॉलिक यंत्रणा अचानक हवेतच बंद पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या विमानाचे सेफ लँडिंग करण्यात आलं आहे.

Air India flight
Air India flight

Air India flight : तामिळनाडूतील त्रिची हून युएईमधील शारजाहला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात गुरुवारी हवेत उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाची हायड्रॉलिक सिस्टिम अचानक निकामी झाल्याने विमानाचे त्रिची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. सुदैवाने या विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आलं आहे. या विमानात १४० प्रवासी होते. काही तास आकाशात उड्डाण केल्यावर सुरक्षित या विमानाचे लँडिंग करण्यात आलं. यावेळी रुग्णवाहिका व इतर सुरक्षा यंत्रणा विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीसाठी तैनात करण्यात आले होते. विमान व प्रवासी सुखरूप आहेत.

शारजाहला जाणाऱ्या आयएक्स ६१३ या विमानाने उड्डाणानंतर लगेचच वैमानिकाला विमानातील तांत्रिक बिघाड लक्षात येताच त्याने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली. त्रिची एअरफिल्डवर विमानाने तासभर उड्डाण केले. यानंतर या विमानाला सुखरूप उतरण्यासाठी हवेत इंधन भरण्यात आलं.

विमानतळ संचालक गोपालकृष्णन यांनी सांगितले की, विमानाने उड्डाण केल्यावर त्यात तांत्रिक बिघाड झाला. या नंतर हे विमान विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यासाठी त्रिची हवाई क्षेत्राभोवती फिरत होते. दरम्यान याची माहिती ही विमानतळ प्रशासनाला देण्यात आली. यावेळी विमान सुरक्षित उतरवण्यासाठी विमानतळावर २० हून अधिक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. कोणत्याही संभाव्य अपघाताला सामोरे जाता यावे यासाठी आपत्कालीन सेवा सर्व प्रकारे सज्ज करण्यात आल्या होत्या.

विमान हवेत का फिरत होतं?

विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरवण्यासाठी इंधन कमी करण्याची गरज होती. कारण उड्डाणाच्या वेळी विमानात भरपूर इंधन असतं. जेणेकरून ते लांब पल्ल्यापर्यंत उड्डाण करू शकेल. आपत्कालीन परिस्थितीत विमान परत उतरवावे लागल्यास त्याचे वजन इंधनामुके जास्त असल्याने तसेच विमानाचा स्फोट होऊ नये या साठी विमानातील इंधन कमी केले जाते.

जास्त वजनामुळे लँडिंगदरम्यान धावपट्टीवर विमानावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे विमानाला इंधन ाचा वापर करण्यासाठी काही वेळ हवेत फिरावे लागते जेणेकरून विमानातील इंधन कमी होऊन ते सुरक्षितपणे उतरू शकेल.

हायड्रोलिक सिस्टम म्हणजे काय?

हायड्रोलिक प्रणाली ही एक तांत्रिक प्रणाली आहे जी द्रवपदार्थ, सामान्यत: तेलाच्या दाबाचा वापर करून विमानाच्या विविध भागांवर नियंत्रण ठेवते आणि विमानाच्या उड्डाणासाठी मदत करते. लँडिंग गिअर (विमानाची चाके), फ्लॅप, ब्रेक आणि स्टेअरिंग नियंत्रित करणे यासारख्या विमानाच्या अनेक महत्त्वाच्या यंत्रणेच्या सुरक्षित कामासाठी ही प्रणाली मदत करते. या प्रणालीशिवाय विमानाच्या या महत्त्वाच्या भागांना योग्य रितीने काम करणे अवघड होऊन बसते, ज्यामुळे सुरक्षित उड्डाण आणि लँडिंगमध्ये अडचणी येऊ शकतात. हायड्रोलिक सिस्टीम निकामी झाल्यास विमानावर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा मानली जाते.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर