वैमानिकांची ड्यूटी संपल्याने एयर इंडियाचे पॅरिस-दिल्ली विमान जयपूरला उतरवले; प्रवासी ताटकळले
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वैमानिकांची ड्यूटी संपल्याने एयर इंडियाचे पॅरिस-दिल्ली विमान जयपूरला उतरवले; प्रवासी ताटकळले

वैमानिकांची ड्यूटी संपल्याने एयर इंडियाचे पॅरिस-दिल्ली विमान जयपूरला उतरवले; प्रवासी ताटकळले

Nov 20, 2024 06:39 AM IST

air india flight from paris diverted to jaipur : एअर इंडियाने यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिली नाही. जयपूर विमानतळावर पर्यायी उड्डाणाची व्यवस्था कंपनीने केली नाही, कारण तसे केल्यास प्रवाशांना बसने दिल्लीला पाठवण्यापेक्षा जास्त वेळ लागला असता, असे सूत्रांनी सांगितले.

वैमानिकांची ड्यूटी संपल्याने एयर इंडियाचे पॅरिस-दिल्ली विमान जयपूरला उतरवले;  प्रवासी ताटकळले
वैमानिकांची ड्यूटी संपल्याने एयर इंडियाचे पॅरिस-दिल्ली विमान जयपूरला उतरवले; प्रवासी ताटकळले

air india flight from paris diverted to jaipur : पॅरिसहून नवी दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे एआय-२०२२  क्रमांकाचे विमान धुके आणि धुक्यामुळे सोमवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू शकले नाही. हे  विमान जयपूरकडे वळविण्यात आले. यानंतर या  विमानाच्या वैमानिकांनी ड्युटीची वेळ संपल्याचे कारण देत विमान पुढे उडविण्यास नकार दिला. यामुळे जयपूर विमानतळावर गोंधळ उडाला. गेल्या ४ दिवसांनपासून या ठिकाणी प्रवासी अडकून पडले आहे. यामुळे  विमान कंपनीना प्रवाशांना बसने दिल्लीला नेण्याची वेळ आली आहे.

एअर इंडियाकडून यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही.  जयपूर विमानतळावर पर्यायी उड्डाणाची व्यवस्था कंपनीने केली नाही, कारण तसे केल्यास प्रवाशांना बसने दिल्लीला पाठवण्यापेक्षा जास्त वेळ लागला असता, असे सूत्रांनी सांगितले. पॅरिसहून रविवारी रात्री १० वाजता निघालेले एआय-२०२२ क्रमांकाचे विमान सोमवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीला पोहोचणार होते.  मात्र,  सोमवारी सकाळी दिल्लीतील धुक्यामुळे हे विमान जयपूरकडे वळविण्यात आले.

जयपूर विमानतळावर विमान दिल्लीला जाण्यासाठी परवानगीच्या प्रतीक्षेत असताना वैमानिकांनी ड्युटीची वेळ संपल्याचे कारण देत पुढील उड्डाण करण्यास नकार दिला. यानंतर गदारोळ माजला. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने तयार केलेल्या फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) नियमांनुसार, फ्लाइट क्रूला पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक आहे. 

तर दुसरीकडे, विमानात अडकलेल्या प्रवाशांचा दिल्लीला जाणारा प्रवास लांबला. प्रवासी विमानतळावरच अडकून पडले आहे. प्रवाशांनी  पर्यायी विमानाची मागणी केली, परंतु जयपूरमधील विमान कंपनीने तशी व्यवस्था केली नाही. त्यानंतर या प्रवाशांना रस्त्याने बसने दिल्लीला रवाना करण्यात आले. सोशल मीडियावर यावर बरीच टीका होत आहे. विशाल पी नावाच्या एका प्रवाशाने सोशल मीडिया एक्सवर लिहिले की, "सीडीजी-डीईएलकडून विमान क्रमांक #AI2022 हे जयपूरला वळविण्यात आल्याने आज एयरइंडियाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा पुढे आला. जयपूरमध्ये प्रवासी तब्ब ५ तास विमानात बसून होते. यानंतर प्रवाशांना बसने दिल्लीला पाठवण्यात आले. मी व माझी पत्नी आणि आमचे दोन महिन्यांचे बाळ या संकटात अडकून पडलो असून  आम्ही हतबल आहोत.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर