‘एअर इंडिया एक्सप्रेस’ च्या एका विमानात शुक्रवारी सकाळी उड्डाण भरल्यानंतर धूर येऊ लागला. त्यानंतर याचे तिरुवनंतपुरम विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमान कंपनी आणि विमान तळाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. मस्कतला जाणाऱ्या विमानातून धूर निघत असल्याचा इशारा सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मिळाला होता.
१४८ प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी सकाळी तिरुवनंतपुरम विमानतळावरून उड्डाण करताच माघारी परतले. विमानातील १४२ प्रवाशांना तपासणीसाठी खाली उतरवण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रवाशांना पोहोचण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. धुराचे कारण काय, याचा तपास केला जात आहे. आम्ही विमान सेवेच्या प्रत्येक पैलूमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देतो आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करतो, असे विमान कंपनीने स्पष्ट केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. कंपनीने जारी केलेल्या निवदेनानुसार आयएक्स ५४९ या विमानाच्या उड्डाणादरम्यान यातून धूर आढळून आला. त्यानंतर विमान परत तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरवण्यात आले. धूर कशामुळे येत होता, हे अद्याप समोर आले आहे. याचा तपास केला जात आहे.
या घटनेची चौकशी केली जाईल, असे एअर इंडियाने म्हटले आहे. याआधी ४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीहून बहरीनला जाणाऱ्या विमानात टेक ऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता. तसेच इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. डीजीसीएने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
हायड्रोजनवर चालणारी ट्रेन लवकरच भारतात रुळावर धावणार आहे. जर्मनीची कंपनी टीयूव्ही-एसयूडी या ट्रेनचे सेफ्टी ऑडिट करणार आहे. या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले की, या ट्रेनची ट्रायल रन डिसेंबर २०२४ मध्येच सुरू होऊ शकते. अशी ट्रेन जगातील केवळ चार देशात धावते आता भारत पाचवा देश बनणार आहे. आतापर्यंत जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनमध्ये या ट्रेन धावतात. या देशांमध्ये हायड्रोजन ट्रेन आधीच चालवल्या जात आहेत.आता भारतही यात सामील होणार आहे.
संबंधित बातम्या