एव्हिएशन सेक्टर रेग्युलेटर डीजीसीएने शुक्रवारी एअर इंडियाला मोठा दंड ठोठावला आहे. डीजीसीएने उड्डाण ड्यूटीवेळी वेळेची मर्यादांशी संबंधित मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियाला ८० लाख रुपयांना दंड ठोठावला आहे. ही कारवाई उड्डाण सेवा वेळ मर्यादित करणे आणि चालक दलाच्या रेस्ट संबंधित नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान ड्युटीच्या वेळेची मर्यादा आणि फ्लाइट क्रू मेंबर्सच्या आरामा संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एअरलाइनवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. डीजीसीएने जानेवारी महिन्यात एअर इंडियाची अचानक तपासणी केली होती. त्यावेळी एअर लाईन्सकडून नियमांच्या उल्लंघनाचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी डीजीसीएने १ मार्च रोजी एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
एअरलाइनकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली गेली. डीजीसीएने केलेल्या तपासणीमध्ये आढळले होते की, काही उड्डाणांमध्ये ६० वर्षांहून अधिक वयाच्या दोन फ्लाइट क्रू मेंबर्सना एकत्र उड्डाण करण्यास पाठवून विमान नियम १९३७ च्या नियम २८A च्या उप-नियम (२) चे उल्लंघन केले आहे.
त्याबरोबर ऑडिट दरम्यान ड्यूटी कालावधी अधिक असणे, चुकीच्या पद्धतीने मार्क प्रशिक्षण रेकॉर्ड आणि ओव्हरलॅपिंग ड्यूटी आदि चुकाही आढळल्या.
१ मार्च रोजी वॉचडॉग द्वारे एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वॉचडॉगने म्हटले की, ते भारतातील नागरी उड्डाण क्षेत्रात सुरक्षेचा सर्वोच्च स्तर कायम राखण्यासाठी वचनबद्ध आहेत.
संबंधित बातम्या