मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air India Offer : केवळ १,७९९ रुपयांत विमानप्रवास, एअर इंडियाची भन्नाट ऑफर

Air India Offer : केवळ १,७९९ रुपयांत विमानप्रवास, एअर इंडियाची भन्नाट ऑफर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 10, 2024 06:07 PM IST

Air India Express Offer : एअर इंडियाने विमान प्रवासासाठी भन्नाट ऑफऱ आणली असून केवळ १७९९ मध्ये तुम्ही भारतातील अनेक शहरांमध्ये विमान प्रवास करू शकता.

Air India Offer
Air India Offer

Air India Express Offer : एअर इंडियाची सब्सिडियरी एअरलाइन एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. एअर इंडियाने 'टाइम टू ट्रॅव्हल' मोहिमेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केवळ १,७९९ रुपयात देशातील काही निवडक शहरात विमान प्रवास करण्याची संधी आहे. ही ऑफर ११ जानेवारी २०२४ ते ११ जानेवारी २०२५ दरम्यान बुक केलेल्या तिकीटावर मिळणार आहे.

एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापर्यंत हीऑफरसुरू राहणार आहे. या ऑफरमध्ये बेंगळुरु-चेन्नई, दिल्ली-जयपूर, बेंगळूरु-कोची, दिल्ली-ग्वाल्हेर आणि कोलकाता-बागडोगरासारी मोठी शहरे सामील आहेत.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या या ऑफरमध्ये प्रवाशांना केवळ १, ७९९ रुपयात विमान प्रवासाची संधी आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. जर तुम्ही कमी तिकीट दरात देशातील वेगवेगळ्या शहरांना भेटी देणार असाल तर या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

एअर इंडिया सोबतच टाटा समूहाची एअरलाइन्स कंपनी विस्तारानेही आपल्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त प्रवाशांसाठी ऑफरची घोषणा केली आहे. विस्ताराने विशेष ऑफरची घोषणा केली आहे. विस्ताराच्या या ऑफरनुसार अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर प्रवाशांना विशेष सवलतीचा लाभ मिळत आहे. विमान कंपनीने ९ जानेवारी २०१५पासून ही ऑफर सुरु केली आहे.

WhatsApp channel

विभाग