Air India Express Flight Cancelled: एअर इंडिया एक्सप्रेसचे तब्बल ७८ विमानांचे उड्डाणे अचानक रद्द करण्यात आले. विमान कंपनीचे कर्मचारी आणि क्रू मेंबर्स आजारी असल्याचे कारण देत अचानक सामूहिक रजेवर गेल्याने कंपनीवर ही वेळ आली आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचं विलिनीकरण होणार असून या मुळे नोकरी धोक्यात येणार असल्याची भावना दोन्ही एअरलाईन्सच्या वैमानिक आणि केबिन क्रूच्या कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे हे कर्मचारी या विलिनीकरणाला विरोध करून त्यामुळे कर्मचारी सामूहिक रजेवर गेले असल्याची माहिती आहे. त्यांच्या रजेमूळे प्रवाशांना मात्र, फटका बसला आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीचे तब्बल ७८ हून अधिक आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानांची उड्डाणे आज अचानक रद्द करण्यात आली आहेत. या बाबत एएनआयने वृत्त दिले आहे. एअरलाइनचे वरिष्ठ क्रू मेंबर्स अचानक आजारी पडले असून त्यांनी सामूहिक रजा घेतली आहे. त्यामुळे कंपनीने ही उड्डाणं रद्द केली आहे. या संपूर्ण प्रकारांवर नागरी विमान वाहतूक अधिकारी लक्ष ठेवून आहेत. याचा फटका मात्र, प्रवाशांना बसला आहे. अचानक विमाने रद्द झाल्याने विमानतळावर चौकशी करून यावे असे आवाहन कंपनीने प्रवाशांना केले आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस आणि एयर इंडिया यांच्या विलीनिकरनाचे वृत्त आहे. या कंपनीत काही दिवसांपासून केबिन क्रू कर्मचाऱ्यांची देखील कमतरता आहे. काही कर्मचाऱ्यांनी टाटा समूहाच्या मालकी असलेल्या या विमान कंपनीत गैरव्यवस्थापन होत असल्याचा आरोप केला आहे. याचा निषेध करण्यासाठी अनेक कर्मचारी हे आजारी असल्याचे कारण देत सामूहिक रजेवर केले आहेत. एअर इंडियामध्ये एक्स कनेक्ट कंपनीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आपल्या नोकऱ्या धोक्यात येतील अशी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची भावना आहे.
या प्रकरणी एअर इंडिया एक्सप्रेसबे निवेदन जारी करून प्रवाशांना याची माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, "आमच्या वरिष्ठ केबिन क्रूच्या काही कर्मचाऱ्यांनी अचानक आजारी असल्याचे कारण देत रजा घेतली असल्याने अनेक विमानांचे उड्डाण हे रद्द करावे लागले. तर काही फ्लाईटला उशीर झाला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही समिति नेमली असून आम्ही क्रू मेंबर्ससोबत बोलत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आमची टीम वेगानं काम करत आहे, असे देखील कंपनीने म्हटले आहे.
संबंधित बातम्या