मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air India : आकाशात दोन विमानांची टक्कर होता होता टळली, क्षणाचा जरी विलंब झाला असता तर..

Air India : आकाशात दोन विमानांची टक्कर होता होता टळली, क्षणाचा जरी विलंब झाला असता तर..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 26, 2023 07:25 PM IST

आकाशात दोन विमानांची टक्कर होता होता वाचली आहे.एयर इंडिया आणिनेपाळ एयरलाइन्सचेविमानएकमेकांच्या एकदम जवळ आले होते.एक क्षणााचा जरी विलंब झाला असता तरी शेकडो प्रवाशांचे प्राण संकटात होते.

Air India
Air India

आकाशात दोन विमानांची टक्कर होता होता वाचली आहे. एयर इंडिया आणि नेपाळ एयरलाइन्सचे विमान एकमेकांच्या एकदम जवळ आले होते. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी घडली. वॉर्निंग सिस्टमने वेळीच वैमानिकांनी अलर्ट केल्याने मोठा अनर्थ टळला. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. या प्रकरणी नेपाळ सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने एयर ट्रॅफिक कंट्रोलर विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. 


शुक्रवारी सकाळी नेपाळी एयरलायन्स एयरबस ए-३२० कुआलालंपूरहून काठमांडूकडे येत होते. तर नवी दिल्लीतून काठमांडू जात असलेले एअर इंडियाचे विमानही आकाशात होते. एयर इंडियाचे विमान १९ हजार फूट उंचीवरून लँडिंग करण्यासाठी खाली येत होते. दुसरीकडे नेपाळ एयरलायन्सचे विमान त्याच लोकेशनवर १५ हजार फूट उंचीवरून उड्डाण करत होते. नेपाळी सिविल एव्हिएशनच्या प्रवक्त्याने सांगितले की, मात्र नेपाळ एयरलायन्सचे विमान तत्काल ७ हजार फूट खाली आले व अपघात टळला. 

हे प्रकरण समोर आल्यानंतर याची चौकशी केली जात आहे. सिविल एविएशन अथॉरिटीने यासाठी तीन सदस्यीय समितीचे गठन केले आहे. त्याचवेळी नेपाळ सिविल एविएशन अथॉरिटी (सीएएएन) ने प्रकरणात सक्त कारवाई करत तिघांना निलंबित केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग