मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

May 18, 2024 07:13 PM IST

Air Force Recruitment 2024 Eligibility: भारतीय हवाई दलात एअरमेन गट व्हाय वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी रिक्त जागा आहेत.

भारतीय वायुसेनेत नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.
भारतीय वायुसेनेत नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

Air Force Recruitment 2024 Selection Process: भारतीय हवाई दलात एअरमेन गट व्हाय वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी रिक्त जागा आहेत. या पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार airmenselection.cdac.in या अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेला येत्या २२ मे पासून सुरुवात होणार आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जून २०२४ आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही भरती फक्त पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, चंदीगड आणि लडाखमधील रहिवाशांसाठी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

हवाई दलाच्या एअरमेन गट व्हाय वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवाराने ५० टक्के गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रमही केलेला असावा आणि ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच, फार्मसीमध्ये बीएससी करणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २२ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल. तर, उमेदवार ५ जून २०२४ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतील

वयोमर्यादा:

भारतीय हवाई दलात एअरमेन गट व्हाय वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्मदिवस २४ जून २००० ते २४ जून २००३ दरम्यानचा असावा.यासोबतच फार्मसीमध्ये डिप्लोमा किंवा बीएससी केलेल्या उमेदवारांचे २४ जून २००० ते २४ जून २००५ दरम्यान असावा.

निवड प्रक्रिया:

या भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती चाचणी घेतली जाते. उमेदवारांना लेखी परीक्षेलाही हजर राहावे लागेल. त्यानंतर वैद्यकीय परीक्षा होईल.

अर्ज शुल्क

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये + जीएसटी भरावा लागेल.

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती

भारतीय पोस्ट ऑफिसने विविध पदांसाठी अर्ज मागिवले आहेत.इच्छुक उमेदवार भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी marathi.hindustantimes.com या वेबसाईटवर भेट द्यावी.

 

टी-२० वर्ल्डकप २०२४