Canada Plane Crash: दक्षिण कोरियापाठोपाठ कॅनडातही विमानाला अपघात, लँडिंगदरम्यान आग; पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Canada Plane Crash: दक्षिण कोरियापाठोपाठ कॅनडातही विमानाला अपघात, लँडिंगदरम्यान आग; पाहा व्हिडिओ

Canada Plane Crash: दक्षिण कोरियापाठोपाठ कॅनडातही विमानाला अपघात, लँडिंगदरम्यान आग; पाहा व्हिडिओ

Dec 29, 2024 02:00 PM IST

Canada Plane Catches Fire: दक्षिण कोरियातील भीषण विमान दुर्घटनेनंतर कॅनडातही असाच अपघात घडला एअर कॅनडाचे विमान लँडिंगदरम्यान हॅलिफॅक्स विमानतळावर कोसळले.

 दक्षिण कोरियापाठोपाठ कॅनडातही विमानाला अपघात
दक्षिण कोरियापाठोपाठ कॅनडातही विमानाला अपघात

Canada Plane Crash: दक्षिण कोरियातील भीषण विमान दुर्घटनेनंतर कॅनडातही असाच अपघात घडला आहे. एअर कॅनडाचे विमान हॅलिफॅक्स विमानतळावर लँडिंग करत असताना धावपट्टीवरून घसरले. त्यानंतर विमानाला आग लागली.  या घटनेनंतर हॅलिफॅक्स विमानतळ परिसरात प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

कॅनडातील या दुर्घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये लँडिंगदरम्यान विमानाला आग लागल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान पाल एअरलाइन्सचे आहे. एअर कॅनडाचे एसी २२५९ हे विमान सेंट जॉन्स ते हॅलिफॅक्स दरम्यान उड्डाण करत होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात विमानातील दृश्य दिसत आहे. यामध्ये प्रवासी घाबरलेले दिसत आहेत.

दक्षिण कोरियाच्या विमानतळावर लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवरून घसरले आणि काँक्रीटवर आदळले. या दुर्घटनेत दोन जण वगळता विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा देशातील सर्वात भीषण विमान अपघातांपैकी एक आहे. सेऊलपासून २९० किलोमीटर दक्षिणेला असलेल्या मुआन शहराच्या विमानतळावर कोसळलेल्या जेजू एअरच्या विमानातील प्रवाशांसाठी बचाव कार्य सुरू असल्याचे नॅशनल फायर एजन्सीने म्हटले आहे. हे विमान बँकॉकहून १८१ प्रवाशांना घेऊन परतत होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर