मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Aidmk Party Broken Alliance With Bjp In Tamilnadu South India

AIDMK vs BJP : भाजपला मोठा धक्का, दक्षिण भारतात विश्वासू मित्राने साथ सोडली

AIDMK vs BJP In Tamilnadu
AIDMK vs BJP In Tamilnadu (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Sep 19, 2023 09:26 AM IST

AIDMK vs BJP : कर्नाटकमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आता दक्षिण भारतातून भाजपसाठी बॅडन्यूज समोर आली आहे. त्यामुळं मोदींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

AIDMK vs BJP In Tamilnadu : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता भाजपसाठी दक्षिणेतून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. तामिळनाडूतील प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेल्या ऑल इंडिया द्राविड मुन्नेत्र कळघम अर्थात एआयडीएमकेने भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली आहे. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी दिवंगत द्रविड नेते सीएन अण्णादुराई यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळं एआयडीएमकेच्या नेत्यांनी थेट भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय द्राविड नेते तसेच पक्षाच्या नेत्यांविषयी आगामी काळात वादग्रस्त वक्तव्ये खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा एआयडीएमकेने भाजपच्या नेत्यांना दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपशी युती तोडताना अण्णा द्रमुकने भाजपा नेते अण्णामलाई यांना लक्ष्य केलं आहे. स्वत:चा प्रभाव वाढवण्यासाठी अण्णामलाई हे अण्णादुराई, रामस्वामी पेरियार, एमजी रामचंद्रन आणि जयललिता यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी केला आहे. अण्णा द्रमुकच्या आरोपांवर भाजपने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. परंतु आता कर्नाटकातील पराभवानंतर भाजपला दक्षिण भारतात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची भाजपच्या दिल्लीतील शीर्ष नेत्यांकडून दखल घेण्यात आल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी अण्णा द्रमुकचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी अण्णा द्रमुकच्या नेत्यांवर जोरदार टीका सुरू केली होती. अण्णामलाई यांच्यावर आवर घालण्याची मागणी पलानीस्वामी यांनी अमित शहांकडे केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अण्णा द्रमुकचे अनेक नेते नाराज होते. त्यातूनच युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.