Kristalina Georgieva: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढीमुळे जगभरातील सुमारे ४० टक्के लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागल्याची शक्यता आहे, असा इशारा एएमएफने दिला आहे. आयएमएफच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या देशांना सर्वाधिक नुकसान सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
आयएमएफने रविवारी जागतिक श्रम बाजारावर एआयमुळे संभाव्य परिमाणाचे मूल्यांकन केले. त्यांनी सांगितले की, एआयमुळे जागतिक स्तरावर सामाजिक आणि आर्थिक असमानता वाढण्याचा धोका आहे. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी धोकादाय प्रवृत्तीचा सामना करण्याचे तसेच समाजिक तणाव रोखण्यासाठी सक्रीय पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
जॉर्जिव्हा म्हणाल्या की, "आपण एका तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहोत, ज्यामुळे उत्पादकता वाढू शकते. तसेच जागतिक विकासाला चालना मिळू शकते आणि जगभरातील उत्पन्न वाढू शकते. परंतु, याचा परिणाम जगभरातील रोजगारावर होण्याची शक्यता आहे. एआयमुळे जगभरातील ४० टक्के लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. तर, श्रीमंत देशात ६० टक्के लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. तसेच कमी उत्पन्न असलेल्या देशांमधील २६ टक्के लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात."
कमी उत्पन्न असलेल्या देशांना अल्पावधीत एआयपासून कमी नुकसान होऊ शकते. आयएमएफच्या मते, अनेक देशांकडे एआयचे तात्काळ लाभ घेण्यासाठी कुशल कामगार पायाभूत सुविधा नाहीत, ज्यामुळे तंत्रज्ञान असमानता पसरण्याचा धोका वाढतो. एआयमुळे जगातील विविध देशांमध्ये उत्पन्न आणि संपत्ती असमानतेवर देखील परिणाम करू शकते. जे लोक एआयचा फायदा घेऊ शकतात, त्यांच्या उत्पदनात वाढ होऊ शकते. परंतु, याउलट अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
आयएमएफपूर्वी Goldman Sachs ने एआयमुळे जगभरातील ३०० दशलक्ष नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याउलट वॉल स्ट्रीट बँकेने एआयमुळे रोजगारासह ७ टक्के जीडीपीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती.
संबंधित बातम्या