मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आता भीती दाखवू लावले AI, डेथ कॅलक्युलेटर आता सांगणार कोणत्या दिवशी होणार मृत्यू, एक्सपर्ट म्हणाले..

आता भीती दाखवू लावले AI, डेथ कॅलक्युलेटर आता सांगणार कोणत्या दिवशी होणार मृत्यू, एक्सपर्ट म्हणाले..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 25, 2024 04:52 PM IST

AI Predicts Day of Death :आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर एक "डेथ कॅलक्युलेटर बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. जे तुमच्या मृत्यूच्या दिवसाची भविष्यवाणी करेल.

death calculator that predicts the day you will die
death calculator that predicts the day you will die

AI मध्ये कठीणातील कठीण काम सुटकीसरशी करण्याची क्षमता आहे. मात्र एआय इतक्या पुरतेच मर्यादित राहिले असते तर चांगले होते. मात्र एआय याच्याही खूप पुढे गेले आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आता एआय हेसुद्धा सांगेल की, तुमचा मृत्यू कधी होईल. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल मात्र हे सत्य आहे. 

ही बाब समोर आली आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर एक "डेथ कॅलक्युलेटर बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. जे तुमच्या मृत्यूच्या दिवसाची भविष्यवाणी करेल. हे ऐकायला एखाद्या भयंकर स्वप्नासारखे आहे. मात्र भविष्यात हे होऊ शकते. 

कोणी मृत्यूबाबत भविष्यवाणी करेल याची शक्यता दूर दूरपर्यंत दिसत नव्हती. मात्र हे सुद्धा  आता मानवाच्या आवाक्यात आले आहे. नेचर कम्प्यूटेशनल सायन्स जर्नलमधील ज्या पेपरमुळे वाद निर्माण झाला त्यामध्ये मृत्यूची भविष्यवाणी करण्यासाठी एआयचा उपयोग करण्याचा समावेश होते. मात्र हे अचूक नव्हते. डेनमार्कमध्ये हजारो लोकांची आर्थिक आणि आरोग्यविषयक माहितीचा वापर करत एक एआय-बेस्ड सिस्टम जवळपास ७८ टक्के अचून भविष्यवाणी करण्यास सक्षम होती. त्यांने सांगितले की, येत्या चार वर्षात कोणते लोक मरतील.

मृत्यूची भविष्यवाणी करत आहे life2vec -
बीमांकिक टेबल बनवण्यासाठी वापर केल्या जाणारे एल्गोरिदम आधीपासूनच अशाप्रकारचे स्टॅटिस्टिकल पूर्वानुमान करत आहेत. मात्र नवी सिस्टिम, ज्याला  life2vec म्हटले जात आहे, ते अधिक अचूक असून पूर्णपणे भिन्न पद्धतीने काम करते. पेपरचे लीड ऑथर, कोपेनहेगन विद्यापीठातील कॉम्प्लेक्सिटी सायन्सचे प्रोफेसर सुने लेहमॅन यांनी म्हटले की, life2vec  आयुष्यातील घटनांसंबंधित अशा पद्धितीने भविष्यवाणी करते ज्याप्रकारे ChatGPT शब्दांची भविष्यवाणी करते.

डेथ कॅलक्युलेटरचा चुकीच्या पद्धतीने वापर करू शकतात लोक –

अशा एल्गोरिदमचा उपयोग लोकांसोबत भेदभाव करणे तसेच त्यांना आरोग्य विमा देण्यापासून वंचित ठेवले जाऊ शकते. तसेच त्याचा वापर आयुष्याला प्रभावित  करणाऱ्या कारकांचा वापर करून लोकांना अधिक वर्षे आयुष्य जगण्यासाठी केले जाऊ शकते. तसेच जीवनकाळाची गणना करून काही लोक आपला रिटायरमेंट प्लान करू शकतात.

WhatsApp channel

विभाग