गुजरातमधील अहमदाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेने एक्सवर एक पोस्ट करून सांगितले की, उशिराने आल्याबद्दल झोमॅटो बॉयने जखमी असल्याचा बहाना केला, माफी मागितली. त्यानंतर आपला प्रायव्हेट पार्ट काढून महिलेसमोरच अश्लील चाळे करू लागला. महिलेने याची तक्रार झोमॅटो कंपनीकडे केली आहे. महिलेची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान झोमॅटोने संबंधित एजंटची सेवा बंद केली आहे. अहमदाबादच्या या ग्राहकाने सोशल मीडिया पोस्टमध्ये आपली व्यथा सांगितली जी आता ऑनलाइन व्हायरल झाली आहे. आपल्या पोस्टमध्ये महिलेने म्हटले आहे की, झोमॅटो डिलिव्हरी बॉयने जेव्हा ती ऑर्डर घेण्यासाठी गेली तेव्हा त्याने आपला प्रायव्हेट पार्ट तिच्यासमोर ओपन केला.
महिलेने सांगितले की, तिने २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झोमॅटोच्या माध्यमातून कॉफी मागवली होती. डिलिव्हरी पार्टनर १५-३० मिनिटे उशीरा तिच्या लोकेशनवर पोहोचला, असे तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे. रात्री १२ वाजून ४८ मिनिटांनी तिला झोमॅटो डिलिव्हरी एजंटचा फोन आला आणि ती ऑर्डर घेण्यासाठी गेली. तिने लिहिले की, पहिल्यांदा त्याने हसत हसत विलंब झाल्याबद्दल माफी माहितली. त्यानंतर तो वारंवार माफी मागत होता. त्यामुळे तिला असहज वाटत होते.
झोमॅटो डिलिव्हरी बॉय महिलेला आपला पाय दाखवत होता. तिला सांगत होता की, पायाला जखम झाली आहे. महिलेने सांगितले की, पाऊस पडत होता व डिलिव्हरी बॉय पायाकडे इशारा करत होता. जेव्हा तिने त्याच्या पायाकडे बॅटरी पाडली त्यावेळी तिच्या लक्षात आले की, त्याचा प्रायव्हेट पार्ट पँटमधून बाहेर होता. महिलेला त्रास देण्यासाठीच त्याने हे केले होते. हे करताना तो निर्लज्जपणे हसत होता. तो म्हणत होता मॅडम प्लीज मदत करा.
महिलेने तात्काळ झोमॅटोला घटनेची माहिती दिली आणि काही मिनिटांनंतर कंपनीकडून फोन आला. झोमॅटो कथेच्या दोन्ही बाजू ऐकून घेईल आणि डिलिव्हरी एजंटकडे त्याची बाजू मांडेल असे सांगितल्यानंतर तिला "पुढील सूचना येईपर्यंत थांबा" असे सांगण्यात आले.
काही तासांनंतर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हची सेवा संपुष्टात आली असून त्याचा परवाना काढून घेण्यात आल्याची माहिती मिळाली.
झोमॅटो माझ्याशी जोडला गेला आणि मी कायदेशीर अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला. डिलिव्हरी बॉयला कामावरून काढून टाकण्यात आले असून त्याचा परवाना काढून घेण्यात आला आहे,' असे महिलेने आपल्या अपडेटमध्ये म्हटले आहे. "मी असे म्हणणार नाही की मला आता सुरक्षित वाटते, मला अजूनही असुरक्षित वाटते, परंतु त्यांनी जे शक्य होते ते केले. मी अजूनही भयभीत आहे कारण तो पत्त्यावर परत आला तर? पण आता मला कायदेशीर आधार आहे, असेही महिलेने म्हटले आहे.