एक स्त्री आपल्या कतृत्वाने भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावते. डोक्यावरक पदर घेतलेली पाहायला गेलं तर एक सर्वसाधारण स्त्री. मात्र आपल्या कार्यानं त्यांनी मुघल राजांनाही चकीत केलं. खुद्द टिपू सुलतानाने ज्यांना तत्वज्ञ महाराणी अशी उपमा देत त्यांच्या कार्यात बाधा आणली नाही अशा अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती.
बीड जिल्ह्यातल्या चौंडी या गावी अहिल्याबाईंचा जन्म झाला. धनगर समाजात जन्म झालेल्या अहिल्याबाईंचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्याशी झाला.
भारत या हिंदू देशांवर अनेक परकीय आक्रमणं झाली आणि अनेक राजांनी इथल्या मंदिरांची नासधूस केली. यात गझनीच्या मोहम्मदाने आपल्या आक्रमणांच्या वेळी गुजरातच्या सोमनाथ मंदिराची सर्वात जास्त नासधूस केली. औरंगजेबाच्या काळातही हिंदू देवळांवर हल्ला करून त्यांना नासधूस करण्याचं काम केलं गेलं. याच औरंगजेबाने १६६९ साली काशीच्या विश्वनाथ मंदिराचा विध्वंस घडवून आणला. त्या जागी मशीद बांधली. १७०१ साली औरंगजेबाने सोमनाथ मंदिर असे फोडले की परत बांधताच येणार नाही.
मात्र हा इतिहास माहिती असतानाही अहिल्याबाईंनी मंदिरांच्या जिर्णोद्धाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. कोणाच्याही भावना न दुखावता अहिल्याबाईंनी मंदिराच्या जिर्णोद्धाराची जबाबदारी घेतली.
देशभरातील बारा ज्योतिर्लिंग तसंच इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम त्यांनी हाती घेतलं. हे हिंदू धर्माचे मानबिंदू आहेत हे अहिल्याबाईंना चांगलंच ठावूक होतं. मात्र धर्मांध न होता सर्वाना सोबत घेऊन त्यांनी हिंदूंना आपले जुनं वैभव परत मिळवून दिलं.याच सर्वात आदर्श उदाहरण म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर.
त्यानंतर काशीचा मुख्य समजला जाणारा मणीकर्णिका घाटही अहिल्यादेवींनीच बांधला.काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिराच्या उभारणीच्या वेळी तिथं मुस्लीम राजे राज्य करत होते मात्र अहिल्यादेवींच्या मुत्सद्दीपणानं त्या राजांनीही या हिंदू मंदिरांना साधा स्पर्शही केला नाही.
अहिल्यादेवींनी तीर्थक्षेत्रांना फक्त उजाळाच दिला नाही तर शेकडो राज्यांमध्ये वाटल्या गेलेल्या देशाला त्यांनी मंदिरं, घाट, रस्ते, धर्मशाळा आणि बारवांच्या माध्यमातून जोडण्याचे अचाट आणि अफाट कार्य केले. त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून अहिल्यादेवींना पुण्यश्लोक या उपाधीनं संबोधण्यात आलं.
भारत सरकारनेही त्यांच्या याच कार्याचा गौरव केला, त्यांच्या नावाने टपाल तिकीटही काढण्यात आले आणि आज अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कारही भारत सरकारतर्फे दिला जातो.
संबंधित बातम्या