Viral News: हाय हील्स सँडल आणून दे, नाहीतर घटस्फोट घे; पती- पत्नीमधील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: हाय हील्स सँडल आणून दे, नाहीतर घटस्फोट घे; पती- पत्नीमधील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात!

Viral News: हाय हील्स सँडल आणून दे, नाहीतर घटस्फोट घे; पती- पत्नीमधील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात!

Published Feb 04, 2025 01:42 PM IST

Husband Wife Viral News: पतीने हाय हील्स सँडल आणून दिली नाही म्हणून एका महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून पतीशी घटस्फोट घेण्याची मागणी केली आहे.

 हाय हील्स सँडल आणून दे, नाहीतर घटस्फोट घे; पती- पत्नीमधील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात!
हाय हील्स सँडल आणून दे, नाहीतर घटस्फोट घे; पती- पत्नीमधील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात!

Agra Woman Seeks Divorce Over High Heels Sandals: पती-पत्नीमध्ये कोणत्या कारणांवरून वाद होईल, हे सांगता येऊ शकत नाही. आग्र्यामधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने हाय हील्स सँडल खरेदी न केल्याने संतापलेल्या एका महिलेने थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला. या दाम्पत्यांना कुटुंब समुपदेशन केंद्रात पाठवण्यात आले. मात्र, या प्रकरणाने अनेकांना धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जोडप्याचे गेल्या वर्षी लग्न झाले. महिलेला हाय हील्स सँडल घालण्याची आवड आहे. त्यामुळे लग्नानंतर तिने आपल्या पतीकडे हाय हील्स सँडलची मागणी केली. पण पतीने तिला नकार दिला. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. पतीला वाटले की, काही काळानंतर त्याची पत्नी हाय हील्स सँडलचा हट्ट सोडून देईल. परंतु हे प्रकरण वाढत गेले आणि भांडणापर्यंत पोहोचले.

हाय हील्स सँडलमुळे पेटलेला वाद इतका वाढला की, पत्नीने सासरचे घर सोडले. आता ती गेल्या १ महिन्यापासून तिच्या माहेरी राहत आहे. जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, तेव्हा पोलिसांनाही आश्चर्य वाटले. पोलिसांनी दोघांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. दोघेही एकमेकांपासून घटस्फोट घेण्यावर ठाम होते. शेवटी पोलिसांनी दोघांनाही एका समुपदेशकाकडे पाठवले.

कुटुंब सल्ला केंद्राचे सल्लागार डॉ. सतीश खिरवार यांच्या मते, या जोडप्याचे लग्न २०२४ मध्ये झाले. दोघेही आग्राचे रहिवासी आहेत. पतीने सांगितले की, त्याच्या पत्नीने हाय हील्स सँडल घालण्याचा आग्रह धरला आहे आणि त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून ती माहेरी राहत आहे. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा दोघांनाही समजावून सांगण्यात आले. दोघांनाही राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर