मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agnipath : संरक्षण मंत्रालय ते क्रीडा मंत्रालय, ‘इथे’ असतील अग्निवीरांना संधी

Agnipath : संरक्षण मंत्रालय ते क्रीडा मंत्रालय, ‘इथे’ असतील अग्निवीरांना संधी

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 18, 2022 04:36 PM IST

संरक्षण मंत्रालय कार्यालयाने जाहीर केलेल्या एका निवेदनात जो अपेक्षित पात्रता मानदंडात उत्तीर्ण होईल त्या अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयातल्या १० टक्के रिक्त स्थानांसाठी आरक्षित केलं जाईल

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (हिंदुस्तान टाइम्स)

एकीकडे देशात अग्निपथ योजनेला विरोध होताना पाहायला मिळत आहे. तिथेच दुसरीकडे मात्र भारताच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र शनिवारी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. संरक्षण मंत्रालय कार्यालयाने जाहीर केलेल्या एका निवेदनात जो अपेक्षित पात्रता मानदंडात उत्तीर्ण होईल त्या अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयातल्या १० टक्के रिक्त स्थानांसाठी आरक्षित केलं जाईल.सरकारने हे स्पष्ट केलं आहे की जे अपेक्षित पात्रता मानदंड पूर्ण करतील त्यांचा कोटा माजी सैनिकांच्या कोट्यापेक्षा वेगळा असेल. तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार क्रीडा मंत्रालय ४ वर्षांसाठी अग्निवीरांना सेवा देण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. मात्र हिसेच्या मार्गाचं युवकांनी समर्थन करु नये. हिंसेनं काहीही साध्य होत नाही असंही अनुराग ठाकूर म्हणाले आहेत.

तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आवश्यक पात्रता मानदंडांना पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालयात १० टक्के रिक्त जागांना भरण्याचे आदेशही दिले आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या प्रावधानांना लागू करण्यासाठी प्रासंगिक भरती नियमांमध्ये आवश्यक संशोधन केलं जाईल.

 

आवश्यक वयोमर्यादेत सूट देण्याच्या गोष्टींवरही विचार केला जाईल. याशिवाय भारतीय तटरक्षक दल आणि डिफेन्स सिव्हिल पोस्टसाठी आणि संरक्षण क्षेत्राच्या सर्व १६ सार्वजनिक उपक्रमांच्या नोकरीत १० टक्के रिक्त पदांना आरक्षण दिलं जाईल. सरकारच्या म्हणण्यानुसार हे आरक्षण माजी सैनिकांना मिळणाऱ्या कोट्यापेक्षा वेगळं असेल.

तिथेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी युवकांना हिंसा न करण्याचं आवाहन केलं. हिंसा हा योग्य मार्ग नाही असं अनुराग ठाकूर म्हणालेत. सरकार तुमच्या चिंता गांभिर्याने घेत आहे. युवा आणि क्रीडा मंत्रालयानेही ४ वर्षाच्या सेवेनंतर त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा विचार करत असल्याचं अनुराग ठाकूर म्हणालेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या