मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  संतापजनक! मुंबईत कोरियन तरुणीच्या विनयभंगानंतर गोव्यात रशियन महिलेवर बलात्कार

संतापजनक! मुंबईत कोरियन तरुणीच्या विनयभंगानंतर गोव्यात रशियन महिलेवर बलात्कार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 03, 2022 12:04 AM IST

Russian woman raped in goa : मुंबईत दक्षिण कोरियन युट्यबर तरुणीची छेडछाड केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच गोव्यात एका परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

पणजी – गोव्याला दररोज हजारो विदेशी पर्यटक भेट देत असतात. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी असते. मात्र काही समाजकंटकांच्या वागण्यामुळे देशाची बदनामी होते. मुंबईत रस्त्यावर एका दक्षिण कोरियन युट्यूबर तरुणीची दोन तरुणांकडून छेडछाड केल्याची घटना ताजी असतानाच गोव्यात एका विदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ही महिला रशियन असल्याची माहिती मिळत आहे.

गोवा राज्यात पर्यटनासाठी आलेल्या एका विदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी२संशयितांना अटक केली आहे. या घटनेमुळे गोव्यात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सोशल मीडियावर दक्षिण कोरियन युट्यूबर मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत होता. तरुणी युट्यूब लाइव्ह करत असताना एका तरुणानं तिचा हात पकडून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.  या व्हिडीओमध्ये ती तरुणी विरोध करत असतानाही एक व्यक्ती तिचा हात पकडून तिला गाडीवरून लिफ्ट देतो असं म्हणत असल्याचं दिसत आहे. तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तरुणी प्रसंगावधान राखून तिथून निसटण्यात यशस्वी होते. याची तक्रार दाखल होताच मुंबई पोलिसांनी त्या दोन टवाळखोरांना अटक केली आहे.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या