राज ठाकरे इफेक्ट..! महाराष्ट्रानंतर आता उत्तरप्रदेशात भोंग्याबाबत नियमावली जारी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राज ठाकरे इफेक्ट..! महाराष्ट्रानंतर आता उत्तरप्रदेशात भोंग्याबाबत नियमावली जारी

राज ठाकरे इफेक्ट..! महाराष्ट्रानंतर आता उत्तरप्रदेशात भोंग्याबाबत नियमावली जारी

Published Apr 20, 2022 05:00 PM IST

लाऊड स्पीकरच्या वादामुळे यूपीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये,अशा सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.सरकारने पोलीस-प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

<p>उत्तरप्रदेशात भोंग्याबाबत नियमावली जारी</p>
<p>उत्तरप्रदेशात भोंग्याबाबत नियमावली जारी</p>

Loudspeaker Row in Maharashtra and UP:  देशात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाऊड स्पीकरच्या वादामुळे यूपीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, अशा सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत. सरकारने पोलीस-प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ३ मे रोजी अक्षय्य तृतीया आणि ईद एकाच दिवशी असल्याने त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था कडेकोट ठेवण्याचे आदेश दिले आहे. 

समाजवादी पक्षाच्या महिला नेत्याने हिंदुत्वादी संघटनांना इशारा दिला होता की, जर मशिदीवरील लाऊडस्पीकर हटवले तर मुस्लिम महिला मंदिरांच्या समोर कुरानाचे पठण करतील. त्यानंतर यूपीमधील भोंग्यांचा वाद चिघळला होता. त्या पार्श्वभूमीवर सीएम योगी यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य सर्वांनाच आहे, मात्र माईकचा आवाज परिसराच्या बाहेर जाऊ नये, याची काळजी घ्यावी. योगी म्हणाले, 'धार्मिक विचारधारेनुसार प्रत्येकाला त्याच्या उपासना पद्धतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. लाऊडस्पीकरचा वापर करता येईल, पण आवाज आवारातून बाहेर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. इतर लोकांची गैरसोय होऊ नये. याशिवाय नवीन ठिकाणी माईक लावण्यास परवानगी दिली जाणार नाही,' असेही योगी यांनी स्पष्ट केल आहे. 

महाराष्ट्र सरकारचा लाउड स्पीकरबाबतचा निर्णय -

लाऊडस्पीकरच्या वादानंतर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नव्या आदेशानुसार आता महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. कोणत्याही धार्मिक स्थळावर लाऊडस्पीकरचा वापर करण्यासाठी आता प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल, असे महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने एका आदेशात म्हटले आहे.

काय आहे वाद ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर या वादाला सुरुवात झाली आहे. वास्तविक, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारला इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, राज्य सरकारने ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवावेत. तसे न केल्यास मनसे कार्यकर्ते मशिदीबाहेर स्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करतील. या मुद्द्यावर आपण मागे हटणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी त्यांनी देशभरातील हिंदूंना तयार राहण्याचे आवाहनही केले आहे. त्याचबरोबर त्यांनी अक्षय्यतृतीयेदिवशी राज्यभरातील मंदिरात महाआरती करण्याची घोषणा केली आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर