मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viral news : हायकोर्टाने निर्णय देताच वकिलाने छतावरून मारली उडी! काय आहे प्रकरण, वाचा

viral news : हायकोर्टाने निर्णय देताच वकिलाने छतावरून मारली उडी! काय आहे प्रकरण, वाचा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 03, 2024 09:12 AM IST

patna high court : पटणा हायकोर्टात शुक्रवारी मोठा गोंधळ उडाला. हायकोर्टाने दिलेला आदेश ऐकताच वकीलने छतावरून उडी मारली.

patna high court
patna high court

patna high court : पटणा उच्च न्यायालयात शुक्रवारी एक विचित्र घटना घडली. पत्नीशी भांडण झाल्यानंतर त्यांचे प्रकरण ही हायकोर्टात सुनावणीसाठी आले होते. दरम्यान, कोर्टाने निकाल दिल्याने तो मान्य नसल्याने वकिलाने थेट न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. मात्र, पहिल्या मजल्यावर खाली शेड असल्याने तो बचवला.

Pimpri-chinchwad suicide : अभ्यास करण्यावरून आईने रागावले! पिंपरी-चिंचवडमध्ये १३ वर्षांच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

दरम्यान, त्याने उडली मारल्याने शेड तुटून खली पडले. यात वकील जखमी झाला. दरम्यान, या घटनेमुळे कोर्टात गोंधळ झाला. न्यायालयाच्या आवारात उपस्थित काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वकिलाविरुद्ध दाखल झालेल्या एका खटल्याची सुनावणी उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठासमोर झाली. त्यानंतर ही घटना घडली. वास्तविक, पत्नीकडून हुंड्याबाबतचा वाद कोर्टापुढे सुनावणीसाठी आला होता. या प्रकरणी न्यायालयाने एकच तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. जे वकील मान्य करायला तयार नव्हता. यामुळे त्याने पहिल्या मजल्यावरून उडी मारली. दरम्यान, खली असलेल्या शेड सारकह्या बाल्कनीत वकील पडला. त्याच्या वजनामुळे शेड देखल कोसळले. यात वकिलाला किरकोळ दुखापत झाली. तेथे उपस्थित वकिलांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. जो सध्या व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे 498A चे प्रकरण आहे. वकिलाने खटला रद्द करण्यासाठी अर्ज केला होता, तो न्यायालयाने फेटाळला. आणि वकिलाला मोठा दंडही ठोठावण्यात आला आहे. खटला निकाली काढल्यानंतर वकिलाने न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर हायकोर्टाच्या आवारात वकिलांच्या हायव्होल्टेज ड्रामामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.

WhatsApp channel

विभाग