Viral News : प्रेयसीशी भांडण झाल्यानं प्रियकराने हवेतच उघडला विमानाचा आपत्कालीन दरवाजा; प्रवाशांचा जीव टांगणीला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : प्रेयसीशी भांडण झाल्यानं प्रियकराने हवेतच उघडला विमानाचा आपत्कालीन दरवाजा; प्रवाशांचा जीव टांगणीला

Viral News : प्रेयसीशी भांडण झाल्यानं प्रियकराने हवेतच उघडला विमानाचा आपत्कालीन दरवाजा; प्रवाशांचा जीव टांगणीला

Jan 09, 2025 10:34 AM IST

Viral News : विमानात असतांना फोनवर बोलण्यावरून प्रेयसीशी भांडण झाल्याने एका प्रवाशाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याने गोंधळ उडाला. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रेयसीशी भांडण झाल्यानं प्रियकराने हवेतच उघडला विमानाचा आपत्कालीन दरवाजा; प्रवाशांचा जीव टांगणीला
प्रेयसीशी भांडण झाल्यानं प्रियकराने हवेतच उघडला विमानाचा आपत्कालीन दरवाजा; प्रवाशांचा जीव टांगणीला (Getty Images via AFP)

Viral News : बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेटब्लू विमानात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे विमानातील सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. विमानातील  एका प्रवाशाने अचानक विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला. प्यूर्टो रिकोच्या सॅन जुआनकडे निघालेल्या फ्लाइट १६१ मध्ये ही घटना घडली. एंजल लुईस टोरेस मोरालेस (रा. प्युर्टो रिको) असे विमानाचा दरवाजा उघडणाऱ्या  प्रवाशाचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरालेस याला इतर  प्रवाशांनी तात्काळ रोखले व दरवाजा बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली.

काय आहे घटना ? 

मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विमान टॅक्सी करत धावपट्टीवर येत असताना ही घटना घडली. टॅक्सींग म्हणजे विमानतळावर विमान हे  धावपट्टीवर उड्डाण करण्यासाठी किंवा लँडिंगनंतर पार्किंग एरियात (टर्मिनल गेट) जाण्यासाठी विमान संथ गतीने नेले जाते. या टॅक्सींग प्रक्रिये दरम्यान विमानाचे इंजिन चालू सुरू होते.  वैमानिक विमानावर नियंत्रण ठेवत  विमानाच्या चाकांच्या साहाय्याने विमान  टॅक्सीवेवर नेलं जातं.  उड्डाण सुरू करण्यासाठी  आणि थांबवण्यासाठी ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. दरम्यान प्रवाशाचे त्याच्या प्रेयसीशी मोबाइलवर बोलण्यावरून भांडण झाल्याने संतप्त झालेल्या प्रवाशाने रागाच्या भरात विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला. काही प्रवाशांनी वेळेत बंद केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.   

मिसौरी राज्य पोलिसांचे प्रवक्ते टिम मॅकगर्क यांनी सांगितले की, टोरेस मोरालेस या प्रवाशाने  अचानक व कुणालाही न सांगता अचानक विंगवरील आपत्कालीन दरवाजा उघडला,  ज्यामुळे आपत्कालीन स्लाइड बाहेर पडले. या घटनेमुळे विमानात गोंधळ उडाला. तसेच विमान उड्डाणास उशीर झाला, अशी माहिती  एअरलाइन्सने आपल्या निवेदनात दिली आहे. यामुळे प्रवाशांना दुसऱ्या विमानाने नेण्यात आले.

या घटनेमुळे विमानात प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.  हा तणावपूर्ण क्षण असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.  प्रवासी फ्रेड विन यांनी डब्ल्यूसीव्हीबी-टीव्हीला सांगितले की, टोरेस मोरालेस आपल्या मैत्रिणीशी मोबाइल फोनवर वाद घालत होता. "त्याला त्याच्या मैत्रिणीचा फोन बघायचा होता, पण तिने नकार दिला. त्यानंतर त्याला राग आला. तो अचानक उठला.  विमानाच्या मधोमध धावत इमर्जन्सी दारवाज्याकडे  गेला आणि त्याने तो उघडला. 

विन यांनी सांगितले की, या घटनेमुली प्रवासी घाबरले होते. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. "लोक ओरडत होते, 'थांबा, थांबा!' हा सर्व प्रकार  खूप भीतीदायक होता.  त्याने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. टोरेस मोरालेसला पोलिसांनी अटक केली असून त्याला  बुधवारी ईस्ट बोस्टन विभागातील बोस्टन म्युनिसिपल कोर्टात हजर करण्यात आले. त्याच्यावर विमान वाहतुकीत अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपीने स्वत:ला निर्दोष असल्याच म्हटलं आहे.. त्याला  ४ मार्च रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर