मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Murder Case : पॅचअप झाल्यानं घटस्फोट नाकारला; पण सूडानं पेटलेल्या पतीनं कोर्टातच चिरला पत्नीचा गळा

Murder Case : पॅचअप झाल्यानं घटस्फोट नाकारला; पण सूडानं पेटलेल्या पतीनं कोर्टातच चिरला पत्नीचा गळा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 16, 2022 11:27 AM IST

Karnataka Murder Case : काही दिवसांपूर्वी मतभेद झाल्यानंतर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. परंतु त्यांनी जूने वाद विसरून एकत्र यायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ही धक्कादायक घटना घडली.

Karnataka Murder Case
Karnataka Murder Case (HT)

Karnataka Murder Case : अनेक लोक आपल्या पत्नीला किंवा पतीला आनंदी ठेवण्यासाठी काय करत नाही?, अनेकदा दाम्पत्यात वाद होतात, परंतु त्यात एकाला सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते, परंतु घटस्फोटासाठी अर्ज दिल्यानंतरही पतीनं पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात घडली आहे. अगदी काही तासांपूर्वीच पतीनं संसारात सुखी राहण्याचं वचन दिलं होतं, त्यानंतर त्यानंच पत्नीची हत्या केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

आरोपी पती शिवकुमार आणि पत्नी चैत्र यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते, त्यामुळं त्यांनी होलेनरसीपुरातील कौंटुबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज करत वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोर्टात काऊंसिलिंग सेशन झाल्यानंतर दोघांना वाद आणि मतभेद विसरून एकत्र येण्याचं ठरवलं होतं. याशिवाय पुढील आयुष्यात सुखी राहण्याच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. परंतु पत्नीविषयी पतीच्या डोक्यात सूड आणि राग होता.

कोर्टातच हत्येचा थरार...

सात वर्ष सोबत राहिल्यानंतर पती शिवकुमार आणि पत्नी चैत्र यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर ते कोर्टाच्या समुपदेशन सत्रासाठी गेले होते, एकमेकांनी केलेल्या चुकांना विसरुन पुन्हा एकत्र येण्याचा दोघांनी मान्य केलं होतं, परंतु कोर्टाच्या समुपदेशन सत्रातून बाहेर येताच चैत्र ही वॉशरुमकडे जात असताना पती शिवकुमारनं तिच्यावर मागून धारदार शस्त्रानं हल्ला केला, त्यानंतर तिला खाली पाडून तिचा गळा कापला, त्यानंतर आरोपी पतीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पती शिवकुमारनं केलेल्या हल्ल्यात त्याची पत्नी चैत्र चा गळा कापला गेल्यानंतर तिला तातडीनं दवाखान्यात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा आरोपी शिवकुमार याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडील धारदार शस्त्रही जप्त करण्यात आली आहे. याशिवाय तो धारदार शस्त्रांसह कोर्टाच्या आवारात कसा घुसला किंवा समुपदेशन सत्रानंतर असं काय घडलं की त्यानं थेट पत्नीवर जीवघेणा हल्ला केला, याचा तपास केला जात आहे. याशिवाय ही पूर्वनियोजित हत्या असल्याची शंकाही काही लोकांनी व्यक्त केली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग