काय चाललंय काय? आधी आइसक्रीमध्ये तुटलेलं बोट, नंतर चीप्समध्ये बेडूक... आता सांभरमध्ये आढळला उंदीर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  काय चाललंय काय? आधी आइसक्रीमध्ये तुटलेलं बोट, नंतर चीप्समध्ये बेडूक... आता सांभरमध्ये आढळला उंदीर

काय चाललंय काय? आधी आइसक्रीमध्ये तुटलेलं बोट, नंतर चीप्समध्ये बेडूक... आता सांभरमध्ये आढळला उंदीर

Jun 21, 2024 04:36 PM IST

rat found in sambar : बाहरेच्या खाण्याचे शौकिन असाल आणि वरचेवर हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये जाऊन वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारत असाल तर आधी ही बातमी वाचा!

काय चाललंय काय? आधी आइसक्रीमध्ये तुटलेलं बोट, नंतर चीप्समध्ये बेडूक... आता सांबारमध्ये आढळला उंदीर
काय चाललंय काय? आधी आइसक्रीमध्ये तुटलेलं बोट, नंतर चीप्समध्ये बेडूक... आता सांबारमध्ये आढळला उंदीर (Instagram/@ahmedabad.updates)

rat found in sambar : मुंबईत आइसक्रीममध्ये माणसाचं तुटलेलं बोट आणि जामनगरमध्ये चिप्सच्या पाकिटात मेलेला बेडूक आढळल्यामुळं बाहेरच्या पदार्थांची स्वच्छता व सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. संबंधित यंत्रणा आपापल्या परीनं या घटनांबाबत चौकशी करत असतानाच गुजरातच्या अहमदाबादमधून आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका रेस्टॉरंटमध्ये सांभरच्या भांड्यात मृत उंदीर आढळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील निकोलमधील देवी डोसा रेस्टॉरंटमध्ये हा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ‘अहमदाबाद अपडेट्स' नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर गुजराती भाषेत कॅप्शनसह या संदर्भातील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यानुसार, 'डोसा रेस्टॉरंटमधील सांभरमध्ये छोटा मेलेला उंदीर सापडला आहे.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटमधील सांभर बाऊलमध्ये मृत उंदीर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये स्वयंपाकघरातील अस्वच्छ जागा दाखवण्यात आली आहे. 

पाहा व्हिडिओ

'टाइम्स नाउ'नं दिलेल्या वृत्तानुसार, रेस्टॉरंट मालक अल्पेश केवडिया यांनी या प्रकारावर लगेचच कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळं हे प्रकरण आता अहमदाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडं सोपवण्यात आलं आहे.

आरोग्य विभागानं या तक्रारीची गंभीर दखल घेतली व एका पथकानं रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघराला भेट दिली. स्वयंपाकघराची जागा उघड्यावर असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. जेवण बनवण्याच्या दृष्टीनं ती असुरक्षित असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळं आरोग्य विभागानं तात्काळ कारवाई करत हे रेस्टॉरंट सील केलं आहे आणि केवडिया यांना नोटीस बजावली आहे.

पुढील कठोर कारवाई टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं रेस्टॉरंटच्या मालकाला तातडीनं या समस्येकडं लक्ष देण्यास सांगितलं आहे. 

वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ

तत्पूर्वी, विदित वार्ष्णेय यानं १८ जून रोजीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. भोपाळ ते आग्रा ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात त्याच्या काका आणि काकूंना मेलेलं झुरळ सापडलं होतं. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) याची तातडीनं दखल घेतली होती. तक्रारीची नोंद करून आयआरसीटीसीनं सेवा पुरवठादाराला योग्य तो दंड ठोठावला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर