मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नव्या वर्षात नवी भरारी! इस्रो उलगडणार ब्लॅक होल्सचे रहस्य; XPoSat उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

नव्या वर्षात नवी भरारी! इस्रो उलगडणार ब्लॅक होल्सचे रहस्य; XPoSat उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Jan 01, 2024 10:30 AM IST

XPoSat Launch Updates : इस्रोने नव्या वर्षाच्या सुरवातीला गगन भरारी घेतली आहे. ब्लॅक होल्स म्हणजेच कृष्णवीवर यांचा अभ्यास करण्यासाठी XPoSat या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. असे करणारा भारत हा अमेरकेनंतर दूसरा देश ठरला आहे.

XPoSat Launch Updates
XPoSat Launch Updates

XPoSat Launch Updates : इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन) २०२४ या वर्षाची सुरुवात जोरदार केली आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रहाचे (XPoSat) आज यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले. ऐतिहासिक चांद्रयान-३ आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहाद्वारे कृष्णविवरांच्या अभ्यास करण्यात येणार असून असा करणारा भारत हा अमेरिकेनंतर जगातील दुसरा देश ठरला आहे.

Bengaluru : सिगारेटच्या अ‍ॅशने केला घात! राख फेकण्यासाठी गेलेल्या तरुण अभियंत्याचा ३३ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

XPoSat द्वारे ब्लॅक होल (कृष्ण विवर) तसेच अनेक खगोलीय निर्मितीचे रहस्य उघड करण्याचा इस्रोचा प्रयत्न आहे. ऑक्टोबरमध्ये गगनयान चाचणी वाहन 'डी1 मिशन'च्या यशानंतर या उपग्रहाचे प्रक्षेपण करून इस्रोने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ही मोहीम पाच वर्षांची असणार आहे. हा उपग्रह ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV)-C58 रॉकेटच्या साह्याने प्रक्षेपित करण्यात आले. या मोहिमेत मुख्य उपग्रहासोबत मुख्य पेलोड 'ExpoSat' आणि १० इतर उपग्रहांचे देखील प्रक्षेपण करण्यात आले असून ते पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत पाठवण्यात आले आहेत.

Maharashtra Weather update: नव्या वर्षात राज्यात ढगाळ हवामान; कुठे पाऊस तर कुठे गारठा, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय ?

तज्ञांच्या म्हणण्यानुसार XPoSat च्या प्रक्षेपणणानंतर लाँ भारताने अंतराळारातील अनेक गुपिते उघड करण्यासाठी भविष्यात विविध मोहीम हाती घेतले जातील, याचे संकेत दिले आहेत. अंतराळ संशोधन, संशोधन आणि विकासात भारताचे प्रयत्न वाढवण्यासाठी ही मोहीम महत्वाची ठरणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अमेरिकेनंतरचा दुसरा देश

XpoSat क्ष-किरण स्त्रोताचे रहस्य उलगडण्यास आणि 'ब्लॅक होल' च्या रहस्याचा अभ्यास करणार आहे. इस्रोच्या मते, अंतराळ-आधारित ध्रुवीकरण मापनांमध्ये खगोलशास्त्रीय स्त्रोतांकडून एक्स-रे उत्सर्जनाचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या पूर्वी अशा प्रकारचा अभ्यास करण्यासाठी यूएस स्पेस एजन्सी NASA ने डिसेंबर २०२१ मध्ये सुपरनोव्हा स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून निघणारे कण आणि इतर खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह पाठवला होता.

एक्सपोसॅटवर असलेले पेलोड

POLIX: ISRO च्या अधिकृत वेबसाईटनुसार, POLIX हे 8-30keV च्या एनर्जी बँडमधील एक्स-रे पोलरीमीटर आहे. हा पेलोड रामम रिसर्च इन्स्टिट्यूट (RRI), बेंगळुरू यांनी UR राव सॅटेलाइट केंद्राच्या (URSC) सहकार्याने विकसित केला आहे. हे उपकरण कोलिमेटरने तयार करण्यात आले आहे.

XSPECT: SPECT हे क्ष-किरण स्पेक्ट्रोस्कोपी आणि टाइमिंग पेलोड आहे, जे क्ष-किरणांची वेळ आणि सूक्ष्म स्पेक्ट्रोस्कोपिक रिझोल्यूशन द्वारे खगोलीय शोध घेणार आहेत.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर