अफगाणिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपांमध्ये जवळपास ४००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मदत व बचावकार्य सुरू सून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात असताना एक चमत्कार समोर आला आहे.
देव तारी त्याला कोण मारी ही म्हण अफगाणिस्तानमधील या विध्वंसकारी भूकंपात खरी ठरली आहे. ३६ तासाहून अधिक काळ ढिगाऱ्याखाली दबूनही एक चिमुकली वाचली आहे. बचाव पथकाने तिला सुखरुप बाहेर काढले आहे.
जवळपास सहा ते आठ महिन्यांचे हे बाळ शेकडो टन वजनाच्या ढिगाऱ्याखालून अडकले होते. जवळपास तीन दिवस अन्न-पाण्यावाचून व हवेशिवाय ही चिमुकली मृत्यूच्या दाढेतून परतली आहे. ही घटना अफगाणिस्तानमधील हेरात प्रांतात घडली आहे. मंगळवारी या बाळाला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आलं. या चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अफगाणिस्तानमध्ये दोन दिवसापूर्वी ६.३ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप आला होता. या आपत्तीत ४ हजार लोकांचा बळी गेला सून जखमींचा आकडा १० हजारांहून अधिक आहे. अफगाणिस्तानमधील गेल्या ४० वर्षातील ही सर्वात मोठी आपत्ती असल्याचे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या