Afghanistan Earthquake update: अफगाणिस्तान आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. वायव्य अफगाणिस्तानात तब्बल ६.३ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली, असे जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (GFZ) ने सांगितले. हे भूकंपाचे धक्के जमिनीखाली १० किमी (६.२१मैल) जाणवले. या पूर्वी शनिवारी झालेल्या भूकंपामुळे अफगाणिस्तानात मोठी हानी झाली होती. सलग सहा भूकंपाचे धक्के बसल्याने ४ हजार नागरिक ठार झाले होते. या धक्क्यातून सावरत असतांना आज पुन्हा भूकंप झाला.
GFZ नुसार, बुधवारी सकाळी अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे पुन्हा जोरदार धक्के बसले. या भूकंपामुळे जीवित किंवा मालमत्तेच्या हानीचे कोणतेही वृत्त नाही. तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपानंतर अफगाणिस्तानात झालेल्या हा सर्वाधिक शक्तिशाली भूकंप आहे. तुर्कस्तान आणि सीरियात झालेल्या भूकंपात ५० हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता.
शनिवारी हेरात शहराच्या वायव्येला झालेल्या भूकंपात ४ हजार हून अधिक लोक ठार झाले तर हजारो नागरिक घरे उद्ध्वस्त झाल्याने बेघर झाल्याची माहिती अफगाणिस्तानचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ANDMA) चे प्रवक्ते मुल्ला सॅक यांनी सांगितले. या सोबतच २० गावांतील सुमारे २ हजार घरे पूर्णपणे कोसळली.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी कार्यालयाने भूकंपाला प्रतिसाद देण्यासाठी ५ दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. अफगाणिस्तानची आरोग्य सेवा, जी मुख्यत्वे परदेशी मदतीवर अवलंबून आहे. मात्र, तालिबान सत्तेवर आल्यापासून दोन वर्षांत ही आंतरराष्ट्रीय मदत थांबवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या