Adult Movie Plays On Japan-Bound Flight:ऑस्ट्रेलियाहून जपानला जाणाऱ्या विमानात धक्कादायक प्रकार घडला. तांत्रिक बिघाडामुळे फ्लाइटमधील सर्व स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडिओ सुरू झाला, हे पाहून सगळेच शॉक झाले. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आणि याबाबत त्यांनी क्रू मेंबर्सकडे तक्रार केली. यानंतर क्रू मेंबर्सनीही घाईघाईने स्क्रीनवर सुरू झालेला बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला. पण यासाठी सुमारे एक तास लागला. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे क्रू मेंबरने म्हटले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्वांटास एअरलाइन्सचे क्यूएफ ५९ फ्लाइटने सिडनीहून जपानमधील हानेडाच्या दिशेने उड्डाण घेतली. प्रत्येकजण प्रवासाचा आनंद लुटण्यात व्यस्त होते. पंरतु, विमान हवेत असताना अचानक सर्व प्रवाशांसमोरील स्क्रीनवर गेल्या वर्षी रिलीज झालेल्या डॅडिओ हा अश्लील चित्रपट दिसू लागला. यामुळे या विमानातून प्रवास करणाऱ्या महिला आणि लहान मुलांना लाज वाटू लागली. त्यानंतर अनेक प्रवाशांनी चित्रपटाचा आवाज कमी केला. परंतु, स्क्रीन बंद करण्यासाठी क्रू मेंबर्सला जवळपास एक तास लागला.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, क्वांटास एअरलाईनने या घटनेला दुजोरा दिला आणि सिस्टीममधील तांत्रिक बिघाडामुळे अचानक अश्लील चित्रपट सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘याबद्दल आम्ही प्रवाशांची मनापासून माफी मागतो. विमान कंपनी तपास करत आहे की, हा चित्रपट अचानक कसा सुरू झाला? क्रू सदस्यांची विचारपूस सुरू आहे. यंत्रणेत काही दोष असल्यामुळे हा प्रकार घडला.’
एका लाइव्ह टेलिकास्टदरम्यान अचानक अश्लील व्हिडिओ सुरू झाल्याने सगळेच प्रेक्षक हैराण झाले. सूर्यग्रहण पाहताना मेक्सिकन न्यूज आउटलेट आरसीजी मीडियाकडून मोठी घोडचूक घडली.अनेक ठिकाणी सूर्यग्रहण दिसल्याने बरेचसे लोक टीव्ही चॅनेलवर लाइव्ह टेलिकास्ट बघत होते. अशाच एका चॅनेलवर लोके ग्रहण पाहत असताना त्या चॅनेलने अचानार एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट दिसला. या कव्हरेजचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.आरसीजी मीडियाच्या २४/७ बातम्यांच्या कार्यक्रमादरम्यान तेथील तीन अँकर हे प्रेक्षकांनी शेअर केलेले सूर्यग्रहणाचे अनेक फुटेज दाखवत असताना हा प्रकार घडला. मात्र या व्हिडिओमुळे त्या चॅनेलला बऱ्याचा टीकेचा सामना करावा लागत आहे. लोक त्यांना खूप काही सुनवत आहेत. एखाद्या प्रेक्षकाने व्हिडीओ पाठवला असेल तर तो टेलिकास्ट करण्यापूर्वी रिव्ह्यू करायला हवा? यामध्ये चूक ही चॅनेलची आहे, असे अनेकांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या