Richest MLAs List : सर्वात श्रीमंत अन् गरीब आमदारांची यादी जाहीर; पाहा कोण कितव्या स्थानी?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Richest MLAs List : सर्वात श्रीमंत अन् गरीब आमदारांची यादी जाहीर; पाहा कोण कितव्या स्थानी?

Richest MLAs List : सर्वात श्रीमंत अन् गरीब आमदारांची यादी जाहीर; पाहा कोण कितव्या स्थानी?

Jul 21, 2023 08:59 AM IST

Richest and Poorest MLAs List : देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरिब आमदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.

Indias Richest and Poorest MLAs List
Indias Richest and Poorest MLAs List (HT)

Indias Richest and Poorest MLAs List : महाराष्ट्रासह देशातील आमदार आणि खासदारांच्या संपत्तीवरून अनेकदा वाद होत असतात. घोटाळ्यांचे आरोप, वैयक्तिक संपत्ती आणि प्रॉपर्टीच्या चर्चांवरून राजकीय वाद अनेकदा पेटत असतो. परंतु आता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांनी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये देशातील सर्वात श्रीमंत आणि गरीब आमदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात देशातील अनेक मातब्बर आणि चर्चित नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. रिसॉर्ट पॉलिटिक्सचे जनक आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहे. तर पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार निर्मल कुमार हे देशातील सर्वात गरीब आमदार असल्याचा दावा या संस्थांच्या रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

देशातील सर्वात श्रीमंत आणि गरीब आमदार कोणते?

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांच्या रिपोर्टमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे १४१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. डीके शिवकुमार यांच्याकडे २७३ कोटी रुपयांची स्थावर आणि ११४० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर कर्नाटकातील अपक्ष आमदार आणि उद्योगपती केएच पुट्टास्वामी गौडा यांचा क्रमांक लागतो. गौडा यांच्याकडे १२६७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यानंतर कर्नाटकातील आमदार प्रियकृष्ण यांचा श्रीमंत आमदारांच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे एकूण ११५६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत १२ आमदार हे फक्त कर्नाटकातील आहे.

बंगालमधील भाजपाचे आमदार निर्मल कुमार धारा हे देशातील सर्वात गरीब आमदार ठरले आहे. त्यांच्याकडे केवळ १७०० रुपयांची संपत्ती आहे. निर्मल कुमार हे २०२१ मध्ये सिंधू विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. निवडणुकीच्या शपथपत्रात त्यांनी केवळ १७०० रुपयांची संतत्ती असल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर आसाम आणि सिक्कीम येथील आमदारांचा यादीत समावेश आहे. त्यामुळं आमदारांच्या संपत्तीवरून पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर