मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pune Railway : प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे- गोरखपूर दरम्यान धावणार उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या

Pune Railway : प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे- गोरखपूर दरम्यान धावणार उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या

Apr 21, 2023 08:14 AM IST

Pune Railway news : मध्यरेल्वेने पुण्याहून इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता उन्हाळी गाड्या सुरू केल्या आहेत. या अंतर्गत पुणे स्टेशनवरुन पुणे-गोरखपूर ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.

Akola Railway Accident
Akola Railway Accident (HT)

पुणे : मध्य रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी पाहता येणाऱ्या काळात विशेष उन्हाळी गाड्या सुरू केल्या आहेत. या अंतर्गत पुणे-गोरखपूर दरम्यान विशेष शुल्कासह विशेष गाडी चालवली जाणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

Twitter Blue Tick: मध्यरात्रीपासून ट्विटरनं केली ब्लू टिक बंद, विराट ते सलमानपर्यंत अनेकांचा यादीत समावेश

रेल्वे जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी पुण्यातून २१ एप्रिल ते १६ जूनदरम्यान सोडली जाणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी ९ वाजता पोहोचेल. ही गाडी गोरखपूरमधून २२ एप्रिल ते १७ जूनदरम्यान सोडली जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तेथून ही गाडी दर शनिवारी रात्री ११.२५ वाजता सुटेल आणि पुण्यात तिसऱ्या दिवशी सकाळी ७.१५ वाजता पोहोचेल. ही उन्हाळी विशेष रेल्वे दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, बिरांगणा लक्षमईबाजी जंक्शन, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, मानकापुर, बस्ती आणि खलीलाबाद रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील चार दिवस तापमान वाढ; मध्य महाराष्ट्र, विदर्भात यलो अलर्ट

या गाडीसाठी आरक्षण विशेष शुल्कासह गुरुवारपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. या गाडीचे सर्वसाधारण द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डबे म्हणून चालविण्यात येणार आहे. प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी करोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर