मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अभिनेते प्रकाश राज यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; पॅलेस्टाईनची तुलना केली काश्मीरशी, VIDEO व्हायरल

अभिनेते प्रकाश राज यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; पॅलेस्टाईनची तुलना केली काश्मीरशी, VIDEO व्हायरल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 19, 2024 12:17 AM IST

Prakash Raj Viral Video : प्रकाश राज यांनी यावेळी पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी केल्याने नवा वाद ओढवून घेतला आहे.

Prakash Raj
Prakash Raj

Prakash Raj Viral Video: साउथ चित्रपटातील दिग्गज अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. कोणत्या ना कोणत्या प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य करणारे प्रकाश राज यांनी यावेळी पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी केल्याने नवा वाद ओढवून घेतला आहे. इतकेच नाही तर त्यांनी असे काही वक्तव्य केले की, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

प्रकाश राज यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही पहिलीच वेळ नाही. प्रकाश राज आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी करताना त्यांनी यावेळी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये प्रकाश राज म्हणत आहे की, पॅलेस्टाईनमध्ये जे काही घडत आहे, तो काय न्याय आहे का? आम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तो न्याय आहे.  प्रकाश राज पुढे म्हणतात की, तुम्ही कोणचाही बाजु घेऊ शकत नाही. कारण तसे करण्याचा काहीच मुद्दा नाही. तुम्ही फक्त त्यांची जमीन परत द्या. विषय फक्त इतकाच आहे.

 प्रकाश राज यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक त्यांना ट्रोल करत आहेत.

यापूर्वीही प्रकाश राज आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहिले आहेत. सनातन धर्म, चंद्रयान मोहीमेवर प्रकाश राज यांनी वादग्रस्त टिप्पणी केली होती.

IPL_Entry_Point