मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Extramarital Affair: आरोपीनं बायकोसह मेहुणीलाही केलं प्रेग्नेंट; पीडितेनं सोशल मीडियावर मांडली व्यथा

Extramarital Affair: आरोपीनं बायकोसह मेहुणीलाही केलं प्रेग्नेंट; पीडितेनं सोशल मीडियावर मांडली व्यथा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 28, 2023 03:34 PM IST

Extramarital Affair Case : नवऱ्याच्या अफेयरबद्दलची माहिती पत्नीला नव्हती. परंतु जेव्हा तिची बहीण लग्नापूर्वीच गरोदर असल्याचं कळताच तिला आश्चर्याचा धक्का बसला.

Extramarital Affair Case
Extramarital Affair Case (HT)

Extramarital Affair Case : लग्नानंतर नात्यात दुरावा येऊ नये, यासाठी दाम्पत्यामध्ये विश्वास असणं अत्यंत आवश्यक असतं. एकमेकांना समजून घेत आनंदानं आयुष्य घालवलं तर कोणतीही अडचण येत नाही. परंतु दोघांमधील एकानंही विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला तर ते नातं फार काळ टिकत नाही. असाच काहीसा आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवऱ्यानं लग्न केल्यानंतर बायकोसह तिच्या बहिणीसोबतही शारिरीक संबध ठेवत दोघांनाही प्रेग्नेंट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत घटनेचा खुलासा केला आहे. त्यामुळं आता विवाहबाह्य संबंधाच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

डेली मिररनं जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार, पीडित महिलेनं Reddit वर तिच्यासोबत घडलेला प्रकार एका पोस्टद्वारे शेयर केला आहे. त्यात तिनं नवऱ्यानं विश्वासघात करत बहिणीलाही गरोदर केल्याचा खुलासा केला आहे. महिलेनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझा नवरा माझी खूप काळजी घ्यायचा. त्यामुळं त्याचं बहिणीशी शारिरीक संबंध असल्याचं कळालं, तेव्हा मला विश्वासच बसला नाही. परंतु विश्वासघात झाल्यानंतर आता माझ्यासह माझी बहिणही नवऱ्याच्या बाळाला जन्म देणार असल्याचं पीडित महिलेनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बहीण गरोदर होईपर्यंत नवऱ्यानं त्याच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती समजू दिली नाही. त्यानं विश्वासघात करणं हे फार त्रासदायक होतं. परंतु ज्यावेळी नवऱ्याला विवाहबाह्य संबंधाचा जाब विचारला तेव्हा त्यानं माफी मागितली. परंतु आता आम्ही दोघी बहिणी त्याच्या बाळाला जन्म देणार आहोत, असं पीडितेनं म्हटलं आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावर अनेकांनी पीडित महिलेला धोका देणाऱ्या पतीपासून वेगळं होण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय काहींनी अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कायदे तयार करण्याची मागणी केली आहे.

IPL_Entry_Point