मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shraddha Murder Case : गुजरात-हिमाचल आणि दिल्लीत कोण जिंकणार?, आफताबच्या प्रश्नानं पोलिसांना धक्का

Shraddha Murder Case : गुजरात-हिमाचल आणि दिल्लीत कोण जिंकणार?, आफताबच्या प्रश्नानं पोलिसांना धक्का

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 06, 2022 11:08 AM IST

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालानं तुरुंगातून राजकारणात रस दाखवल्यानं पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Shraddha Walker Murder Case
Shraddha Walker Murder Case (HT)

Shraddha Walker Murder Case : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. पोलिसांनी कोर्टाच्या संमतीनं आफताबच्या पाच पॉलिग्राफ टेस्ट आणि एक नार्को टेस्ट केली असून त्यात आरोपी आफताबनं श्रद्धाच्या हत्येचा घटनाक्रम सांगितला आहे. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणात अजून कुणाकुणाचा सहभाग आहे, याचा तपास करायला सुरुवात केली असून त्यातच आता दिल्लीतील तिहाड जेलमध्ये बंद असलेल्या आफताबनं विचारलेल्या एका प्रश्नामुळं पोलिसही हैराण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगात बंद असलेल्या आफताब पुनावालानं पोलिसांना गुजरात, हिमाचल आणि दिल्लीतील एमसीडी निवडणुकीत कुणाचा विजय होणार?, असा प्रश्न विचारला आहे. याशिवाय त्यानं तिन्ही निवडणुकीत रस दाखवला असून याबाबतची काही माहिती वाचण्यासाठी वर्तमानपत्रं आणून देण्याची विनंती सुरक्षा रक्षकांना केली आहे. त्यामुळं आता श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आरोपी आफताबला राजकीय नेत्यानं मदत केली असल्याची शंका उपस्थित होत आहे.

पोलिसांच्या तपासात धक्कादायक गोष्टींचा खुलासा...

पोलिसांनी आरोपी आफताबला ताब्यात घेतल्यानंतर श्रद्धाच्या हत्येचा सीन रिक्रिएट केला होता. त्यानंतर त्यानं श्रद्धाचा गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झालं. याशिवाय श्रद्धाची कवटी फोडण्यासाठी आफताबनं हातोड्याचा आणि मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर केल्याचा धक्कादायक खुलासा झाला. याशिवाय श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवलेला असताना आरोपी आफताबला एक सायकोलॉजिस्ट अससेली तरुणी भेटायला आली होती. त्या तरुणीचीही पोलिसांनी चौकशी केली असून आता या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. आरोपी आफताबला दिल्लीतील तिहाड जेलमध्ये इतर कैद्यांपासून वेगळं ठेवण्यात आलं असून त्याची ठराविक वेळेनुसार वैद्यकीय चाचणीही केली जात आहे.

IPL_Entry_Point