मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kasganj Accident : गावकऱ्यांना गंगास्नानासाठी घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळली; आठ मुलांसह २२ ठार

Kasganj Accident : गावकऱ्यांना गंगास्नानासाठी घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळली; आठ मुलांसह २२ ठार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 24, 2024 04:25 PM IST

UP Kasganj Accident News Today: उत्तर प्रदेशाच्या कासगंजमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Search and rescue operation underway.
Search and rescue operation underway.

Uttar Pradesh Kasganj Tractor Trolley Accident: उत्तर प्रदेशातीलकासगंज जिल्ह्यात गावकऱ्यांना गंगास्नानासाठी नदीकडे घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळली. या घटनेत आठ मुलांसह २२ जणांचा मृत्यू झाला आहे. माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर महिला आणि लहान मुलांसह गावकरी पवित्र स्नानासाठी नदीकडे निघाले होते.

अलिगढ रेंजचे आयजी शलभ माथुर यांनी या दुर्घटनेला दुजोरा देताना सांगितले की, या दुर्घटनेत आठ मुले आणि सात महिलांसह एकूण २२ जणांचा मृत्यू झाला. समोरून येणाऱ्या कारसोबतचा अपघात टाळण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉली चिखलाने भरलेल्या तलावात उलटली. जखमींना कासगंज येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कासगंज जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना अपघातातील जखमींवर त्वरित आणि आवश्यक उपचार करण्याचे निर्देश दिले. कासगंज जिल्ह्यातील पटियाली पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येणाऱ्या या ठिकाणी तातडीने मदतीसाठी संसाधने गोळा करण्याचे आदेश देखील देण्यात आले.

अहमदाबाद बडोदा एक्सप्रेस वेवर बस आणि टँकरमध्ये धडक

अहमदाबाद बडोदा एक्सप्रेस वेवर बस आणि सीमेंट टँकरमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातग्रस्त बसमधून २० हून अधिक जण प्रवास करत असल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point

विभाग