Unnao Accident: डुलकीने केला घात! भरधाव स्लिपर बसची दुधाच्या टँकरला धडक, भीषण अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू; ३० जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Unnao Accident: डुलकीने केला घात! भरधाव स्लिपर बसची दुधाच्या टँकरला धडक, भीषण अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू; ३० जखमी

Unnao Accident: डुलकीने केला घात! भरधाव स्लिपर बसची दुधाच्या टँकरला धडक, भीषण अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू; ३० जखमी

Jul 10, 2024 08:18 AM IST

Unnao Accident: लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावरील बेहता मुजावर भागातील गधा गावाजवळ आज बुधवारी पहाटे ५.३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव स्लीपर बस मागून पुढे जाणाऱ्या दुधाच्या टँकरला धडकल्याने या अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

भरधाव स्लिपर बसची दुधाच्या टँकरला धडक, भीषण अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू; ३० जखमी
भरधाव स्लिपर बसची दुधाच्या टँकरला धडक, भीषण अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू; ३० जखमी

Unnao Accident: लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावरील बेहता मुजावर भागातील गधा गावाजवळ आज बुधवारी पहाटे ५.३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव स्लीपर बस मागून पुढे जाणाऱ्या दुधाच्या टँकरला धडकल्याने या अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३० पेक्षा अधिक प्रवासी हे जखमी झाले आहेत. यातील काही प्रवाशांची प्रकृती ही गंभीर आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच उपेडाच्या जवानांनी पोलिसांना या अपघाताची माहिती देत बचावकार्य सुरू केले.

उन्नावमधील लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर आज बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. बेहता मुजावर परिसरातील गाडा गावाजवळ स्लीपर बसची पाठीमागून पुढे जाणाऱ्या दुधाच्या टँकरवर धडक झाली. या अपघातात एका लहान मुलासह १८ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. येथील जिल्हाधिकारी नम्रता सिंह यांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य राबवले. जखमींना तातडीने जवळील दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.

पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाल्यावर जखमी प्रवाशांनी आरडाओरडा केला. हा आवाज ऐकून यूपीडीएच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना याची माहिती देऊन बचावकार्य सुरू केले. दरम्यान, बांगरमाळ, बेहतामुझावर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी देखील बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना या मार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांच्या मदतीने बाहेर काढले.

बस बिहारहून जात होती दिल्लीला

ही बस बिहारहून दिल्लीला जात होती. या बसमध्ये बहुतांश मजूर प्रवास करत होते. बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. चालकाला डुलकी लागण्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतांची नावे व पत्ते व जखमींची माहिती देण्यात येत आहे. सर्वांना बांगरमाऊ सीएचसी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

चालकाला डुलकी लागल्याने झाला अपघात

चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. एसडीएम नम्रता सिंह यांनीही घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी सीएचसी रुग्णालय गाठून सर्व जखमींची माहिती घेतली. तसेच जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर