नायजेरियामधून एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन झालेल्या भीषण स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाला असून ५० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नायजेरियामधील जिगावा राज्यात ही घटना घडली. येथे एक पेट्रोल टँकर पलटला. टँकर पलटल्यानंतर पेट्रोलची गळती शुरू झाल्याने मोठ्या संख्येने लोक पेट्रोल घेण्यासाठी टँकरच्या जवळ जमा झाले. मात्र अचानक टँकरचा स्फोट झाला. या स्फोटात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, पेट्रोल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यानंतर पेट्रोल चोरण्यासाठी लोक टँकरकडे धावले. त्याचवेळी टँकरचा स्फोट झाला. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. सांगितले जात आहे की, टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटले. त्यानंतर त्यातून तेल गळती सुरू झाली. स्फोट झाला त्यावेळी लोक टँकरमधून पेट्रोल चोरत होते.
पोलिसांनी सांगितले की, पेट्रोलच्या गळतीमुळे टँकरचा स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण टँकर आगीत भस्मसात झाले. या दुर्घटनेत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जिगावा राज्य आपत्तकालीन व्यवस्थापन एजन्सीचे प्रमुख डॉ हारुना मॅरिगा यांनी सांगितले की, ९७ लोकांचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. तर आठ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
पोलिस प्रवक्ते लावन अॅडम यांनी सांगितले की, विद्यापीठाजवळील महामार्गावरून जात असताना टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जिगावा राज्यात मध्यरात्री हा स्फोट झाला. जेव्हा स्फोट झाला तेव्हा रहिवासी उलटलेल्या टँकरमधून इंधन घेत होते, ज्यामुळे भीषण आग लागली आणि १०० हून अदिक लोक जागीच ठार झाले.
या भयंकर अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अपघाताची भीषणता दिसत आहे. अपघातानंतर संपूर्ण परिसरात मोठी आग दिसत आहे. घटनास्थळी मृतदेह विखुरलेले दिसून येत असून अनेक मृतदेह पूर्णपणे जळून कोळसा झालेले आहेत. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या