मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Accenture Lay Off : गुगलनंतर आता अ‍ॅक्सेंचर कंपनीकडून नोकरकपात, १९ हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

Accenture Lay Off : गुगलनंतर आता अ‍ॅक्सेंचर कंपनीकडून नोकरकपात, १९ हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 23, 2023 07:51 PM IST

Accenture Lay Off : आयटी क्षेत्रातली दिग्गज कंपनी असलेल्या अ‍ॅक्सेंचर कंपनीनं तब्बल १९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Accenture Lay Off News
Accenture Lay Off News (REUTERS)

Accenture Lay Off News : गेल्या काही महिन्यांपासून गूगल, मेटा, फेसबूकसह अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठी नोकरकपात केली आहे. त्यामुळं अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार झालेले असतानाच आता आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अ‍ॅक्सेंचर कंपनीनं मोठी नोकरकपात करण्याचा निर्णय गेतला आहे. मंदीचे काळे ढग साचलेले असतानाच कंपनीनं तब्बल १९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं आयटी क्षेत्रासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच मेटा कंपनीनं नोकरकपात केली होती. त्यानंतर आता आयटी क्षेत्रातही नोकरकपात होण्यास सुरुवात झाल्यानं असंख्य कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

अ‍ॅक्सेंचर कंपनीनं एकूण कर्मचाऱ्यांच्या २.५ टक्के म्हणजे १९ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचं ठरवलं आहे. या नोकरकपातीसाठी अ‍ॅक्सेंचर कंपनीनं ग्लोबल इकोनॉमिक आउटलूकला जबाबधार धरलं आहे. टेक्नोलॉजी बजेटच्या कपातीमुळं अ‍ॅक्सेंचर कंपनीनं हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय कंपनीनं वार्षिक महसूल आणि नफ्यासंदर्भातील अंदाजपत्रकही कमी केलं आहे. त्यामुळं आता अ‍ॅक्सेंचर कंपनीच्या नोकरकपातीमुळं आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनावरही बेकारीची कुऱ्हाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निर्धारित अंदाजापेक्षा कमी वार्षिक महसूल मिळाल्यामुळं यापूर्वीच कंपनीनं नोकरकपातीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता कंपनीनं थेट एक पत्रक जारी करत नोकरकपातीची घोषणा केली आहे. आम्हाला आशा आहे की, २०२३ या आर्थिक वर्षात १६.०१ ते १६.०७ अब्ज डॉलर्स इतका महसूल कंपनीला मिळेल, असंही अ‍ॅक्सेंचर कंपनीनं म्हटलं आहे.

WhatsApp channel

विभाग