मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  AAI Recruitment 2024: आयटीआय, इंजिनीअर उमेदवारांसाठी विमानतळ प्राधिकरणात नोकरीची संधी; असा करा अर्ज

AAI Recruitment 2024: आयटीआय, इंजिनीअर उमेदवारांसाठी विमानतळ प्राधिकरणात नोकरीची संधी; असा करा अर्ज

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 16, 2024 04:25 PM IST

AAI Recruitment 2024: भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आयटीआय पास, इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा पदवी असलेल्या उमेदवारांसाठी अॅप्रेंटिसशिप करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

AAI Recruitment 2024:
AAI Recruitment 2024:

AAI Recruitment 2024: भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आयटीआय पास, इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा पदवी असलेल्या उमेदवारांसाठी अॅप्रेंटिसशिप करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. प्राधिकरणाने यासाठी १३० पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२४ अशी असेल, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणतर्फे देण्यात आली आहे.

प्राधिकरणमधील भरतीसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २६ वर्षे आहे. ३१ डिसेंबर २०२३ पासून वयाची गणना केली जाईल.पदवीधर किंवा डिप्लोमा किंवा आयटीआय प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांची एएआय अप्रेंटिसशिपसाठी निवड केली जाईल. उमेदवारांकडे ITI/NCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच

पदवी किंवा डिप्लोमा धारक उमेदवारांनी विद्यार्थी म्हणून ४ किंवा तीन वर्षांचा पूर्णवेळ (नियमित) किंवा तीन वर्षांचा अभियांत्रिकीचा नियमित डिप्लोमा केलेला असावा. तसेच हा अभ्यासक्रमास एआयसीटीई तर्फे मान्यता प्राप्त असला पाहिजे.

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार www.aai.aero या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक महिती तसेच ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पात्रता/पोस्टनिहाय रिक्त पदांचे अधिक तपशील :

पदवीधर : (एरोनॉटिकल, ऑटोमोबाईल, आर्किटेक्चर, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, डेटा अॅनालिसिस, इलेक्ट्रिकल, नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, मेकॅनिकलमध्ये BE/B.Tech): ३० पदे

डिप्लोमा (एरोनॉटिक्स, ऑटोमोबाईल, आर्किटेक्चर, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, डेटा अॅनालिसिस, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, मेकॅनिकल, मॅथेमॅटिक्स/ स्टॅटिस्टिक्स) ४५ पदे

आय टी आय ट्रेड : संगणक ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रिकल, मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स, स्टेनो): ५५ पदे

इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा मात्र अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना आणि अटी यांची सविस्तर माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन विमानतळ प्राधिकरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

WhatsApp channel