Aadhaar Card Update : ज्या आधार धारकांचे कार्ड १० वर्षांपूर्वी दिले गेले आहे व त्यांनी ते तेव्हापासून अपडेट केले नसेल अशांना आधारकार्ड अपडेट करण्यासचे आवाहन सरकारने केले आहे. कार्ड अपडेट करण्यासाठी ओळख आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. यासाठी अंतिम मुदत १४ सप्टेंबर असून मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता फक्त चार दिवस उरले आहेत. यानंतर कार्ड अपडेट केल्यास नागरिकांना ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
सरकारने १० वर्षांपूर्वी अनेकांना आधार कार्ड दिले. या आधारकार्डमध्ये या काळात अनेकांचे पत्ते बदलले. तर काहींच्या कागद पत्रात मोठा बदल झाला. अनेकांनी आधार अपडेट केले नसल्याने कागद पत्र पडताळणी दरम्यान समस्या उद्भवतात. त्यामुळे ज्या नागरिकांनी १० वर्षांपूर्वी आधार कार्ड काढले आहेत व त्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट केले नसेल अशा नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. या साठी १४ सप्टेंबर अंतिम मुदत देण्यात आली आहे. १४ सप्टेंबर पर्यन्त आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे. आधार अपडेट करण्याची मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. असे असतांना नागरिकांनी त्यांची आधार माहिती ही अद्याप अपडेट केलेली नाही.
ही मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली असली तरी UIDAI या मुदतीत आणखी वाढ केली जाणार आहे की नाही या बाबत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे १० वर्षांहून अधिक काळ असलेले आधार कार्ड असेल तर ते १४ तारखेपूर्वी अपडेट करा, अन्यथा ५० रुपयांचे शुल्क भरून या तारखेनंतर अपडेट करावे लागणार आहे.
१ ) आधार कार्ड अपडेट पोर्टलच्या https://myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळावर जा
२) या पोर्टलवर तुमचा आधार क्रमांक आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलेला OTP वापरून लॉग इन करा.
३ ) यात असलेल्या तुमच्या आधारच्या तपशीलांचे पुनरावलोकन करा व यानंतर तुमची ओळख आणि पत्ता तपशील अपडेट करण्यासाठी तुमची प्रोफाइल तपासून घ्या.
४ जर तुम्हाला तुमचा पत्ता किंवा नंबर अपडेट करायचा असेल तर, ड्रॉप-डाउन मेनूमधून तुम्ही सबमिट करू इच्छित कागदपत्रे निवडा आणि तुम्हाला हव्या असलेल्या फाइल अपलोड करा.
५ या ठिकाणी आलेल्या सूचीमधून ओळख आणि पत्ता पुरावा ऑप्शन निवडून त्यात योग्य माहिती भरा.
६. तुमचे कागदपत्र हे २ एमबी पेक्षा कमी असावे याची खात्री करून निवडलेले दस्तऐवज जेपीजीई, पीएनजी, किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
७ सर्व माहिती भरल्यावर ती योग्य आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासून घ्या. यानंतर सबमिट बटन टॅप करून तुमची माहिती अपलोड करा.
आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत ही १४ सप्टेंबर आहे. या तारखे पर्यंत आधारकार्ड मोफत अपडेट करता येणार आहे. यानंतर मात्र आधार अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
सरकार शेतकऱ्यांची देशव्यापी नोंदणी सुरू करणार आहे, जेणेकरून त्यांना आधार सारखे दुसरे ओळखपत्र दिले जाणार आहे. या बाबतची घोषणा कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी सोमवारी केली. पुढील वर्षी मार्चपर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे ध्येय असल्याचे ते म्हणाले.