Viral News : अंटार्क्टिकात बर्फातून वाहतोय रक्ताचा धबधबा ? व्हायरल बातमीमागचं नेमकं सत्य काय ? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : अंटार्क्टिकात बर्फातून वाहतोय रक्ताचा धबधबा ? व्हायरल बातमीमागचं नेमकं सत्य काय ? जाणून घ्या

Viral News : अंटार्क्टिकात बर्फातून वाहतोय रक्ताचा धबधबा ? व्हायरल बातमीमागचं नेमकं सत्य काय ? जाणून घ्या

Jan 31, 2025 06:09 AM IST

Blood Waterfall in Antarctica: अंटार्क्टिकामधील टेलर ग्लेशियरजवळील हा रक्तरंजित धबधबा सुमारे ११० वर्षांपूर्वी सापडला होता. शास्त्रज्ञांच्या मते, ग्लेशियरच्या खाली लोहयुक्त पाणी असतं, जे ऑक्सिजनशी अभिक्रिया करते, ज्यामुळे त्याचा रंग रक्त-लाल होतो.

अंटार्क्टिकात बर्फातून वाहतोय रक्ताचा धबधबा ? व्हायरल बातमीमागचं नेमकं सत्य काय ? जाणून घ्या
अंटार्क्टिकात बर्फातून वाहतोय रक्ताचा धबधबा ? व्हायरल बातमीमागचं नेमकं सत्य काय ? जाणून घ्या

Blood Waterfall in Antarctica: गेल्या ५०० वर्षांत मानवाने पृथ्वीच्या प्रत्येक खंडावर आपला ठसा उमटवला आहे. पण अंटार्क्टिका खंड हा अजूनही माणसासाठी एक कोडचं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ असून या कित्येक मीटर बर्फाखाली नेमकं काय लपलं आहे हे शोधणं शास्त्रज्ञांना देखील कठीण बनलं आहे. आजही पृथ्वीवरील सर्वात गूढ ठिकाण म्हणून  अंटार्क्टिकाचं  नाव घेतलं जातं. या गोठलेल्या खंडावरील अनेक  रहस्ये हळूहळू उलगडत आहेत. ज्यामुळे शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या खंडावरचे असेच  एक रहस्य म्हणजे येथे वाहणारा एक धबधबा ज्याला रक्ताचा धबधबा असं म्हटलं जातं.

अंटार्क्टिकाच्या टेलर ग्लेशियरच्या खालून वेस्ट लेक बोनीमध्ये वाहणारा हा धबधबा त्याच्या लाल रंगामुळे चर्चेत आला आहे. सुमारे ११० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन भूगर्भशास्त्रज्ञ थॉमस ग्रिफिश टेलर यांनी अंटार्क्टिका दौऱ्यात या धबधब्याचा शोध लावला होता. १९११ मध्ये टेलर आणि त्यांच्या टीमला लाल रंग दिसला आणि ते आश्चर्यचकित झाले.

लाल शेवाळ मुबलक असल्याने येथील बर्फाचा रंग रक्तासारखा लाल झाला आहे, असे सुरुवातीला भूगर्भशास्त्रज्ञांचे मत होते. पण नंतर २००३ मध्ये एका दशकानंतर सत्य समोर आले. २००३ मध्ये एका गटाने त्याच्या लाल रंगाची तपासणी केली. या तपासणीत धबधब्यात लोह ऑक्साईडचे प्रमाण खूप जास्त असल्याचे समोर आले. हिमनगाखालील खारट पाणी हवेच्या संपर्कात आल्यास ते अकार्बनी संयुगे तयार करू शकतात व त्यामुळे याच रंग लाल झाला असल्याची माहिती संशोधकांनी दिली होती. संशोधनानुसार येथे एक्स्ट्रामोफिल मायक्रोबियल इकोसिस्टम आहे, ज्यामुळे येथील मिठाचे प्रमाण समुद्री मीठापेक्षा खूप जास्त आहे.

हिमनगाखालील लोहयुक्त पाणी बर्फातून बाहेर पडते. वरील मीठ व हवेच्या संपर्कात येताच ते हवेतील  ऑक्सिजनशी अभिक्रिया करतात.  त्यामुळे त्याचा रंग लाल दिसतो. शतकानुशतके बर्फात राहिल्याने येथे उपस्थित उर्वरित प्राण्यांनी  थंडीशी जुळवून घेतले आहेत. या खंडावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञ येत असून ते येथे विविध प्रयोग करत आहेत. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर