Gonda Accident : भाजपचे वादग्रस्त नेते बृजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषणच्या ताफ्यातील कारने तिघांना चिरडले, २ ठार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gonda Accident : भाजपचे वादग्रस्त नेते बृजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषणच्या ताफ्यातील कारने तिघांना चिरडले, २ ठार

Gonda Accident : भाजपचे वादग्रस्त नेते बृजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषणच्या ताफ्यातील कारने तिघांना चिरडले, २ ठार

Updated May 29, 2024 01:43 PM IST

Gonda Accident : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह (karan bhushan singh) यांच्या ताफ्याचे तीन मुलांना चिरडले असून यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे.

भाजप उमेदवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांच्या ताफ्याचे तीन मुलांना चिरडले
भाजप उमेदवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांच्या ताफ्याचे तीन मुलांना चिरडले

Gonda Accident : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण ताजे असतांना आता अशीच एक घटना यूपीच्या गोंडा जिल्ह्यात घडली आहे. खासदार ब्रिजभूषण शरण यांचा मुलगा आणि कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार करण भूषण शरण सिंह यांच्या ताफ्यातील फॉर्च्युनर कारने दुचाकीस्वार तरुणांना चिरडले. रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या एका महिलेलाही कारने उडवले. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात दखल करण्यात आले आहे.

Pune porsche case : पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या पोर्श कारमध्ये होता आमदाराचा मुलगा, CBI चौकशीची मागणी

गोंडा येथे झालेल्या या भीषण अपघातानंतर नागरिक संतप्त झाले होते. घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिस प्रशासनाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी घोषणाबाजी केली. या घटनेनंतर येथे वाहतूक कोंडी झाली होती. तर तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यास नागरिकांनी विरोध केल्याने पोलिस आणि नागरिक यांच्यात बाचाबाची झाली. खूप प्रयत्न आणि समजूत काढल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर घटनास्थळी उभी असलेली फॉर्च्युनर कार जाळण्याचा प्रयत्न जमावाने केला. दरम्यान मोठ्या प्रमाणात तणाव वाढल्याने या याठिकाणी पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आली. दरम्यान पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

Palghar Boat Capsizes: पालघर बोट दुर्घटनेतील एकाचा मृतदेह सापडला, ११ जणांना वाचवण्यात यश

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कैसरगंजमधील भाजपचे उमेदवार करण भूषण सिंह ज्या वाहनांमध्ये उपस्थित होते, त्या वाहनांने तिघांना उडवले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकांची आक्रमक भूमिका पाहून अनेक अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस परिक्षेत्र अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे. या अधिकाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची फिर्याद मृत तरुणाच्या कुटुंबीयांपैकी चंदा बेगम या महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे. यामध्ये फॉर्च्युनर वाहन क्रमांक यूपी ३२ एचडब्लु १८०० विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये ड्रायव्हरने बेदरकारपणे गाडी चालवताना रस्त्याच्या उजव्या बाजूला येऊन रसत्यवरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याचे म्हटले आहे. यामध्ये दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

प्रभारी निरीक्षक निर्भय नारायण सिंह यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. एसपी विनीत जयस्वाल यांनी सांगितले की, लोकांना समज देऊन शांत करण्यात आले आहे. याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर