मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viral news: तब्बल तीन महिन्यांपासून कोळ्याचे महिलेच्या कानात वास्तव्य; तपासात धक्कादायक माहिती आली पुढे

viral news: तब्बल तीन महिन्यांपासून कोळ्याचे महिलेच्या कानात वास्तव्य; तपासात धक्कादायक माहिती आली पुढे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 30, 2023 01:28 PM IST

viral news : ब्रिटनमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका कोळ्याने थेट एका महिलेच्या कानात संसार थाटला. महिलेच्या कानात सतत दुखत असल्याने ती डॉक्टरकडे गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे.

viral news
viral news

viral news : ब्रिटेनमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेच्या कानात तीव्र वेदना होत असल्याने ती दवाखान्यात गेली. यानंतर डॉक्टराने जे काही सांगितले, त्यामुळे ही महिला हादरून गेली. तिच्या कानात चक्क एक कोळी होता. त्याने कानात राहण्यासाठी जाळे देखील विणल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून महिलेला जबर धक्का बसला. या घटनेमुळे डॉक्टर देखील चक्रावले आहेत.

Mumbai Traffic: नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईत वाहतुकीत मोठे बदल; अशी असेल व्यवस्था

या घटनेची माहिती अशी की, ब्रिटनमध्ये एका महिलेच्या कानात तीन महिन्यांपासून तीव्र वेदना होत होत्या. सुरवातीला तिने या कडे दुर्लक्ष केले. काही त्रास झाल्यास ती बोटाने अथवा बडने साफ करत राहिली. पण तरीही वेदना कमी होत नव्हत्या. एके दिवशी त्याला अचानक जाणवले की एक कोळी तिच्या कानात शिरला असून त्याने तिथे जाळे देखील बनवले. ल्युसी वाइल्ड (वय २९) असे या महिलेचे नाव आहे.

ब्रिटेन येथील चेशायरमध्ये राहणारी ल्युसी ही तीन मुलांची आई आहे. लुसीने ऑक्टोबरच्या मध्यात एके दिवशी तिच्या कानात पहिल्यांदा तिला विचित्र आवाज ऐकू आला. सुरवातीला तिने या कडे दुर्लक्ष केले. मात्र, तिला सतत त्रास होत होता. यामुळे काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले. वेदना वाढू लागल्यावर तिने कान तपासण्याचे ठरवले. तिने दवाखान्यात जात कांन दाखवला. डॉक्टरांना जे काही आढळले त्यामुळे डॉक्टरदेखील हादरले. लुसीच्या कानात एका कोळ्याने जाळे बांधून घर थाटले होते.

Sukanya Samriddhi Yojana : मोदी सरकारचं गिफ्ट! सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात केली वाढ

लुसी म्हणाली, मी कानात जे अडकले होते ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्रास वाढत होता. त्यामुळे आम्ही १११ या (यूके इमर्जन्सी नंबर) वर फोन केला. त्यांनी मला तपासले. माझ्या कानात त्यांनी तेल टाकले. आणि तब्बल ८ पायांचा कोळी बाहेर आला. हा कोळी सुमारे एक सेंटीमीटर लांब होता. डॉक्टरांनी महिलेच्या कानातील जाळे देखील साफ केले. मात्र, तिच्या कानातून रक्तस्त्राव होत होता आणि तिला नीट ऐकू येत नव्हते.

डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की, कानात फक्त कोळीच नाही तर त्याने जगण्यासाठी संपूर्ण जाळे देखील विणले होते. महिलेने सांगितले की, जेव्हा डॉक्टर तिच्या कानातून कोळी काढत होते, तेव्हा तिला पाहून उलट्याही झाल्या. महिलेने सांगितले की ही संपूर्ण प्रक्रिया खूप वेदनादायक होती.

WhatsApp channel

विभाग