IndiGO Plane Viral Video : विमान प्रवासात प्रवाशांमध्ये भांडणे झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असेल. काही प्रवाशांनी तर विमानात लघु शंका देखील केली आहे. आता विमान प्रवासातील आणखी एक घटना चांगलीच व्हायरल होत आहे. ही घटना इंडिगोच्या विमानातील असून उड्डाणाला उशीर झाल्यामुळे एका संतप्त प्रवाशाने आधी एयरहोस्टेसशी वाद घातला; यानंतर त्याने थेट वैमानिकावर हल्ला करत त्याला गुद्दा घालत मारहाण देखील केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रवाशाला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नेटकरी करत आहेत.
व्हायरल व्हिडिओ हा विमानातील एका प्रवाशाने काढला आहे. पायलट आणि इतर क्रू मेंबर्स उभे राहून विमान प्रवासाबाबत घोषणा करत होते. यावेळी एक प्रवासी त्याच्या सीटवरुन उठून थेट एयरहोस्टेसशी वाद घालतो. दरम्यान, एयरहोस्टेस आणि विमानातील क्रू मेंबर या प्रवाशाची समजूत काढतांना दिसत आहे. मात्र, हा प्रवाशी आणखी हुज्जत घालत होता. दरम्यान, वाद वाढल्याने प्रवाशाने धावत जाऊन थेट पायलटला मारहाण केली. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दिल्ली पोलिसही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना इंडिगो विमानात घडली. मात्र हे कोणते विमान होते या बाबत माहिती मिळू शकली नाही. असे म्हटले जाते की, विमानाच्या आधीचया क्रूने FDTL म्हणजेच फ्लाइट ड्युटी वेळेच्या मर्यादांचे उल्लंघन केले. यामुळे दूसरा वैमानिक येऊन प्रवाशांना या संबंधी माहिती देत होता. दरम्यान, विमानाला खूप उशिरी झाला होता. या मुळे प्रवासी ताटकळले होते.
दरम्यान, पिवळा हुडी घातलेला एक प्रवासी असलेला तरुण आला. त्याने क्रू मेंबरशी त्याने हुज्जत घातली. आणि थेट त्याने पायलटवर हल्ला केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांचे संभाषण देखील ऐकू येत आहे. वैमानिकाला मारहाण करणारा व्यक्ती आणि एअर होस्टेसमध्ये वाद झाला. 'जर विमान उडवायचे असेल तर लवकर उडवा, आणि जर विमान उडवायचे नसेल तर दरवाजा उडघडून आम्हाला जाऊ द्या. किती वेळ वाट बघायची?' असा प्रश्न देखील प्रवाशाने विमान क्रूला विचारला. दरम्यान, एयरहोस्टेस त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, प्रवासी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.