Viral Video: सोशलमिडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजकालची तरुणाई वाट्टेल त्या थराला जात आहे. काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतील इंडिया गेटवर टॉवेल गुंडाळून नाचणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. ही घटना ताजी असतांना एका तरुणाने भर बाजारात ब्रा घालून रील तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाजारातील नागरिकांनी या तरुणाला पकडून त्याला चांगलाच चोप दिला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना हरियाणातील पानिपत येथील आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका तरुणाने ब्रा घातली आहे. ब्रा घालून हा तरुण भर बजारात रील तयार करत होता. ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी या तरुणाला पकडले. एवढेच नाही तर तो करत असलेल्या रील बद्दल त्याला जाब विचारला. नागरिक त्याच्या या कृतीमुळे चांगलेच भडकले असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्याच्या भोवती मोठा जमाव जमला असून त्यातील एक व्यक्ति त्याला चांगलाच चोप देत आहेत. हा तरुण बाजाराच्या मधोमध नाचत होता आणि अश्लील कृत्य करत होता, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
रिल बनवणाऱ्या तरुणावर किंवा मारहाणीत सहभागी असलेल्या लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकताच राजधानी दिल्लीतील इंडिया गेटवर टॉवेलमध्ये टॉवेल गुंडाळून नाचणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी प्रचंड संताप व्यक्त केला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डान्सिंग गर्लचे नाव सन्नती मित्रा आहे, जी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि रिल्स पोस्ट करत असते. तत्पूर्वी मित्रा यांच्या दुर्गाच्या मंडपात जाण्यावरून गदारोळ झाला होता.