मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Railway Station Water: रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘रेलनीर’ व्यतिरिक्त ९ ब्रँड्सना विक्रीची परवानगी
Railneer
Railneer

Railway Station Water: रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘रेलनीर’ व्यतिरिक्त ९ ब्रँड्सना विक्रीची परवानगी

25 May 2023, 21:57 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Railneer: रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘रेलनीर’ व्यतिरिक्त नऊ ब्रँड्सना विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

Drinking Water In Railway Station: उन्हाळ्याच्या हंगामात पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला. प्लॅटफॉर्मवर बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे आणखी नऊ ब्रँड्स विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.  हे ब्रँड सक्षम प्राधिकरणाद्वारे नियमितपणे तपासले जातात आणि प्रमाणित केले जातात.

ट्रेंडिंग न्यूज

रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेलनीर व्यतिरिक्त ऑक्सिमोर एक्वा (Oxymore Aqua), रोकोको (Rococco), हेल्थ प्लस (Health Plus), गॅलन्स (Gallons), निंबस (Nimbus), ऑक्सी ब्लू (Oxy Blue), सन रिच (Sun Rich), एल्विश (Elvish) आणि इयोनिटा (Eionita) या नऊ ब्रँड्सना रेल्वे प्लॅटफॉर्मवर विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

सध्या उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे रेल्वेचा पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अंबरनाथ (मुंबई), भुसावळ आणि इतर ठिकाणी उत्पादन आणि बाटलीबंद सुविधेसह भारतीय रेल्वेचा बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा ब्रँड असलेल्या रेलनीर व्यतिरिक्त उपरोक्त ब्रँड्सच्या बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली.

विभाग